पाच कोटी हुंडा, तरीही सासरच्यांनी विवस्त्र करत अंगावर राख फासली
नवविवाहितेसोबत क्रौर्य; उच्चभ्रू कुटूंबातील धक्कादायक प्रकार

प्रतिनिधी | कानपूर
लग्नात पाच कोटी रुपयाचा हुंडा दिल्यावर ही घरात संपत्ती व समृध्दी येण्यासाठी नवविवाहितेचा छळ करत एका उच्चभ्रू कुटूंबातील लोकांनी क्रौर्याची सीमार पार केली. नवविवाहितेला सासरच्यांनी विवस्त्र करत तिच्या अंगावर राख फासली व तंत्र मंत्राच्या पुजेसाठी सर्वांसोबत बसवण्यात आले. अशी नववधूची तक्रार पोलिसात नोंदवण्यात आली, त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
कानपूर येथील प्रतिष्ठीत व उच्चभ्रू वस्तीत राहणारे बब्ू मिश्रा यांचा मुलगा विनीत मिश्रा हे कानपूर येथील सराफा म्हणून प्रसिध्द आहेत. याच परिवारातील मुलगा कौतुक मिश्रा याचा विवाह काही महिन्यापूर्वी शहरातील एका प्रतिष्ठीत परिवारात झाला होता. यावेळी विवाहितेच्या वडीलांनी मिश्रा परिवारास पाच कोटी रुपयाचा हुंडा दिला होता असा आरोप विवाहितेने केला आहे. दरम्यान काही दिवसातच मध्यरात्री सासरच्यांनी झोपेतून उठवून घरात साधना असल्याचे सांगत अंगावरील कपडे काढून या पुजेला बस असे सांगितले. याला विरोध केल्यावर पतीसह सासरच्यांनी विवाहितेस मारहाण करत एका खोलीत बंद केले. त्या ठिकाणी सासऱ्यांनी विवाहितेला विवस्त्र करत अंगावर राख फासली व पुजेला बसवल्याचा आरोप केला आहे.
या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरुन सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



