स्पेन, रशिया, फ्रान्स पाठोपाठ इटलीचाही अमेरिकेला झटका; डोणाल्ड ट्रम्प गोत्यात

प्रतिनिधी | वृत्तसंस्था
आंतरराष्ट्रीय राजकारणात अमेरिकेसाठी चिंताजनक घडामोडी घडत असून स्पेन, रशिया पाठोपाठ आता इटलीनेही अमेरिकेविरोधात ठाम भूमिका घेतल्याचे चित्र आहे. यामुळे माजी राष्ट्राध्यक्ष डोणाल्ड ट्रम्प यांच्यावर राजकीय दबाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अमेरिकेच्या काही धोरणांवर युरोपियन देशांमध्ये प्रचंड नाराजी वाढत आहे. इराण सोबतचे युध्द हे अन्यायकारक असल्याचे वाटत असल्याने सर्व प्रथम नाटो मध्ये सहभागी असलेल्या देशांनी ट्रम्प यांना मदत करण्यास विरोध केला. त्यानंतर इराण वर हल्ला चढवण्यासाठी ट्रम्प यांनी स्पेनची एअर स्पेसची मागणी केली होती ती स्पेनने देण्यास ट्रम्प यांना स्पष्ट नकार दिला. त्या पाठोपाठ अमेरिकेने क्युबा या देशाला कोणत्याही देशाने कच्चे तेल देवू नये असे धमकावले होते. या धमकी पश्चात ही रशियाने या धमकीकडे दुर्लक्ष करत क्युबा ला कच्च्या तेलाचा साठा पुरवला. अमेरिकेकडून इस्त्रायलला शस्त्रसाठा घेवून जाणाऱ्या विमानाला फ्रान्स ने आपल्या हवाई हददीतून जाण्यास मज्जाव केला आहे. त्यामुळे ट्रम्प यांनी फ्रान्सला हे अमेरिका लक्षात ठेवेल असा धमकीवजा इशारा दिला आहे. यानंतर आता ट्रम्प यांना अतिशय जवळचे वाटणारे व युरोप मधील सर्वात शक्तीशाली समजले जाणारे इटली या देशाची पंतप्रधान जार्जिया मेलोनी यांनी अमेरिकन लढाउ विमांनाना सिसली येथे एअरस्पेस देण्यास नकार दिला आहे. दुसरीकडे रशियन चेचन सैन्यानी या युध्दात इराण ला मदत करण्याचा निर्णय घेतला असल्याने आता हळुहळू इराणचे पारडे जड होत असल्याचे चित्र आहे.




