ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात रविवारी दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना शनिवारी संध्याकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
ब्रीच कँडी रुग्णालयाचे डॉ. प्रतीक समदानी यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, आशा भोसले यांना अनेक वैद्यकीय समस्या होत्या आणि मल्टी-ऑर्गन फेल्युअरमुळे त्यांचे निधन झाले.
डॉ. प्रतीक समदानी यांनी पीटीआयला सांगितले की, आशा भोसले यांना मल्टी-ऑर्गन फेल्युअरचा त्रास होता, म्हणजेच त्यांचे अनेक अवयव निकामी झाले होते.
आशा भोसले यांचे पुत्र, आनंद भोसले यांनी सांगितले की, ज्यांना अंत्यदर्शन घ्यायचे आहे ते उद्या सकाळी ११ वाजता त्यांच्या घरी येऊ शकतात. उद्या दुपारी ४ वाजता शिवाजी पार्क येथे अंत्यविधी होणार आहे.



