समृद्धीवर धावत्या बसला अचानक आग; ३५ प्रवासी बचावले

मोठी दुर्घटना टळली, मागील वाहनाची सतर्कता ठरली निर्णायक; बस राख, एक प्रवासी जखमी

बुलढाणा: जिल्ह्याच्या हद्दीत मेहकर-दुसरबीड दरम्यान समृद्धी महामार्गावर नागपूर कॉरिडॉर, चॅनल क्र. २९५.७०० शनिवारी सायंकाळी घडलेली घटना मोठ्या अनर्थाची चाहूल देणारी ठरली. पुणे–पुसद मार्गावरील खासगी ट्रॅव्हल्सला धावत असतानाच मागील भागातून अचानक आग लागली. मागून येणाऱ्या वाहनाने दिलेल्या इशाऱ्यामुळे चालकाने क्षणात बस कडेला घेतली आणि ३५ प्रवाशांना बाहेर काढत जीवितहानी टाळली.
सुमारे ५.३० वाजता पेट घेण्यास सुरुवात झाल्यानंतर काही मिनिटांतच ज्वाळांनी बसला वेढले. प्रवासी खाली उतरत असताना बबन कदम (४८, पुसद) यांना किरकोळ दुखापत झाली; त्यांच्यावर मेहकर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बसमधील प्रवाशांत अकोला, यवतमाळ, पुसद, महागाव, पातूर, नंदापूर, वारंगी, निंबा, शेंदुर्जना मोरे येथील नागरिकांसह सात लहान मुले होती.
माहिती मिळताच पीएसआय राऊत यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. हेड कॉन्स्टेबल गायकवाड, कर्मचारी ढोले, इंगळे, चनक्केश्वर व एमएसएफ जवानांनी परिसर ताब्यात घेत वाहतूक सुरळीत ठेवली. सर्व प्रवाशांना शासकीय वाहनातून मेहकर बसस्थानकात पोहोचविण्यात आले.
दरम्यान, बस पूर्णतः जळून खाक झाली असून प्राथमिक अंदाजानुसार यांत्रिक बिघाडामुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. घटनेनंतर चालक व वाहक घटनास्थळावरून निघून गेल्याची नोंद आहे; पुढील तपास सुरू आहे.

ADMIN

आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा ---------------------------- --------- 9822572589 .......... 9767932688 .......... politicslivenews@gmail.com ---------------------------- राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -------

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!