SRPF जवानाचा  तरुणीवर वर्षभर लैंगिक अत्याचार!; गुन्हा दाखल

 

लोणार
नोकरी लागेपर्यंत प्रेम उफाळून आलेल्या प्रियकराने ‘एसआरपीएफ’मध्ये (राज्य राखीव पोलीस बल) भरती होताच रंग बदलले. तोपर्यंत लग्नाचे आमिष दाखवून अनेकवेळा तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. तो बदलल्याने प्रेयसीने सिडको पोलीस ठाण्यात धाव घेऊन त्याच्याविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी सोमवारी (११ मे) रोजी जवानावर गुन्हा दाखल केला.

नितेश राम चव्हाण (रा. तांबोळा, ता. लोणार, जि. बुलडाणा) असे आरोपीचे नाव आहे.  सदर आरोपीने  १८ ऑक्टोबर २०२४ ते २२ डिसेंबर २०२५ दरम्यान  युवतीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे.  २२ वर्षीय तरुणीने या प्रकरणात आरोप केला आहे की,  ती जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील आहे. २०२३ मध्ये ती पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर शहरात आली होती. तेव्हा नितेश हाही पोलीस भरतीची तयारी करत होता. ती हडको एन १२ स्वामी विवेकानंदनगर भागात रूम करून राहत होती, तर नितेश हाही सुदर्शननगर, टीव्ही सेंटर भागात रूम करून राहत होता. या दरम्यान त्यांची ओळख होऊन मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. ती अधूनमधून त्याच्या खोलीवर डबा घेऊन जायची. १८ ऑक्टोबर २०२४ रोजी ती डबा घेऊन आली असता नितेशने तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. तिने विरोध केला असता त्याने लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर त्याने अनेकदा टीव्ही सेंटरवरील रूमवर, रोझ गार्डनसमोरील लॉजवर, तरुणीच्या खोलीवरही शारीरिक संबंध ठेवले. संबंध ठेवत असताना त्याने तिचे गुपचूप फोटो काढले होते. २०२४ मध्ये नितेश राज्य राखीव पोलीस बल, नागपूर येथे भरती झाला. त्यानंतर लग्नाला नकार देत त्याने दोघांचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली.

फसवणूक झाल्याची जाणीव झाल्याने तरुणीने सिडको पोलिसांत धाव घेऊन तक्रार दिली. अधिक तपास फौजदार निवृत्ती गायके करीत आहेत.

ADMIN

आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा ---------------------------- --------- 9822572589 .......... 9767932688 .......... politicslivenews@gmail.com ---------------------------- राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -------

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!