जळगाव जामोद मध्ये भूमी अभिलेख कार्यालयात लाचखोर कर्मचाऱ्याला पकडले

जळगाव जामोद

  भूमी अभिलेख कार्यालयातील जुनी जागा मोजणी व सीमांकनाच्या कामासाठी १० हजार रुपयांची लाच  मागितल्याप्रकरणी दोघावर गुन्हा दाखल करण्यात आला.  ही कारवाई  मंगळवार १२ मे रोजी दुपारी ३ वाजेच्या दरम्यान  करण्यात आली. या कारवाईमुळे महसूल व भूमी अभिलेख विभागात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने आपल्या वडिलांच्या नावावरील जागेची मोजणी व सीमांकन करण्यासाठी जळगाव जामोद येथील भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज केला होता. अर्जातील त्रुटी दूर करून काम लवकर करून देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याने १० हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तक्रार प्राप्त झाल्यानंतर बुलढाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली. पडताळणीदरम्यान संबंधित कर्मचाऱ्यांकडून लाचेची मागणी झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सापळा रचण्यात आला. त्यानुसार मंगळवारी भूमी अभिलेख कार्यालय परिसरात कारवाई करण्यात आली.  कारवाईदरम्यान तक्रारदाराकडून १० हजार रुपये स्वीकारताना परिरक्षण भूमापक विश्वजीत विनायक सोनोने रा. स्वामी समर्थ मंदिर परिसराजवळ नांदुरा, व सचिन सदाशिव जावपे रा. शिक्षक कॉलनी नांदुरा यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन्ही आरोपींविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली.

ADMIN

आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा ---------------------------- --------- 9822572589 .......... 9767932688 .......... politicslivenews@gmail.com ---------------------------- राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -------

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!