नेपाळमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार लोणारचे कराटेपटू

लोणार

  येथील महाराणा तायकांडो कराटे अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील कराटे स्पर्धांमध्ये दमदार कामगिरी करत सुवर्णपदकांची कमाई केली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाच्या जोरावर आता या खेळाडूंची नेपाळ येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली असून, लोणारसह अकोला परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या  साक्षी नागापूरे,भूमिका सानप, समीक्षा झिने,एकांकुमार राठोड,मेहुल ठाकूर,सोहम जाधव, चंचल दाते
या विद्यार्थ्यांनी गेल्या वर्षभरापासून कठोर सराव व मेहनतीच्या बळावर विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन केले. राज्यस्तर आणि राष्ट्रस्तरावरील स्पर्धांमध्ये गोल्ड मेडल पटकावत त्यांनी आपल्या पालकांसह शाळा, अकॅडमी तसेच तालुका आणि जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे.  नेपाळ येथे १५, १६ आणि १७ मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत हे विद्यार्थी भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या यशाबद्दल मुख्य कराटे प्रशिक्षक संतोष जाधव, प्रशिक्षिका चंचल दाते तसेच प्रशिक्षक आर्यन वानखेडे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत आगामी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. नेपाळ येथे १५, १६ व १७ मे दरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत साक्षी नागापूरे,भूमिका सानप, समीक्षा झिने,एकांकुमार राठोड,मेहुल ठाकूर,सोहम जाधव, चंचल दाते हे विद्यार्थी लवकरच नेपाळसाठी रवाना होणार आहे.

याशिवाय लोणारचे महसूल अधिकारी संतोष जाधव, तालुका भूमिअभिलेख कार्यालयाचे भूमापक उमेश सानप आणि जितेंद्र झिने यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक करून आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही हे खेळाडू उज्वल यश संपादन करतील, असा विश्वास व्यक्त केला.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!