हर्षवर्धन सपकाळांच्या प्रेस मध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्ताचा राडा

मुंबई,

काँग्रेसने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर केलेल्या ‘गुंगी गुडिया’ या टीकेवरून सुरू असलेला राजकीय वाद  आज आणखी चिघळला. काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत या शब्दाचे ठामपणे समर्थन केले आहे. “गुंगी गुडिया हा अपशब्द नसून त्यांच्या मुकेपणाचे ते वर्णन आहे. सुनेत्रा पवारांनी आमच्या टीकेला सकारात्मक घेत इंदिरा गांधींप्रमाणे स्वतःला ‘दुर्गा’ सिद्ध करून दाखवावे,” असे थेट आव्हान सपकाळ यांनी दिले आहे. सपकाळ यांची ही पत्रकार परिषद सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयात घुसून जोरदार घोषणाबाजी आणि आंदोलन केले.

सुनेत्रा पवार अनेक महत्त्वाच्या विषयांवर मौन बाळगून आहेत, याकडे लक्ष वेधत सपकाळ म्हणाले,  अजित पवारांच्या अपघातावर अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही, पण त्या काही बोलत नाहीत. अद्याप त्यांना अर्थखाते मिळालेले नाही, त्यावरही त्या गप्प आहेत. त्यांनी जो हा मुकेपणा आणला आहे, तो उपमुख्यमंत्री पदाला अशोभनीय आहे. यावेळी सपकाळ यांनी माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांचा दाखला दिला. ते म्हणाले, “एका काळात इंदिरा गांधींनाही ‘गुंगी गुडिया’ म्हटले गेले होते. पण त्यांनी आपल्या कर्तृत्वातून स्वतःला असे सिद्ध केले की, अटल बिहारी वाजपेयींसारख्या नेत्यालाही त्यांना ‘दुर्गा’ म्हणावे लागले. आज आम्हीही सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटले आहे, आता त्यांनीही आपण दुर्गा असल्याचे सिद्ध करावे.”

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!