संघर्षातून आई-वडिलांचे स्वप्न साकार करणाऱ्या कन्येचा समाजाला अभिमान!— प्रा. डी. एस. पाटील

एस. बि शेख

आजच्या स्पर्धेच्या युगात यश मिळविणे सोपे राहिलेले नाही. एका-एका गुणासाठी विद्यार्थ्यांना मोठा संघर्ष करावा लागतो. प्रत्येक आई-वडिलांनी आपल्या मुलांकडून काही ना काही स्वप्न पाहिलेले असते. ही स्वप्ने पूर्ण करण्यासाठी संघर्षातून यश संपादन करणाऱ्या मुलांचा सार्थ अभिमान आई-वडिलांसह संपूर्ण समाजाला वाटतो. असेच कौतुकास्पद कार्य फत्तेपूर येथील राजपूत समाजाच्या कन्येने करून दाखविले आहे. तिने शिक्षण क्षेत्रात पाऊल ठेवले असून, भविष्यात ती उच्च पदावर विराजमान होऊन समाजाला यापेक्षाही मोठा आनंद देईल, असा विश्वास केशरिया प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. डी. एस. पाटील यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत जिल्हा परिषद तसेच इतर शाळांमधील शिक्षक भरतीसाठी घेण्यात आलेल्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (MAHATET/TAIT) परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची गुणवत्तेनुसार शिक्षक पदासाठीची पवित्र पोर्टल प्रक्रिया ऑनलाइन व पारदर्शक पद्धतीने राबविण्यात आली.  या भरती प्रक्रियेत फत्तेपूर येथील  पत्रकार अभयासिंग राजपूत यांची कन्या कु. शिवानी अभयासिंग पाटील हिची ठाणे जिल्हा परिषदेत शिक्षिका म्हणून निवड झाली. या उल्लेखनीय यशाबद्दल जामनेर येथील महाराणा उत्सव समिती व केशरिया प्रतिष्ठान यांच्या वतीने फत्तेपूर येथे कु. शिवानी पाटील हिच्या सत्काराचा छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी प्रा. डी. एस. पाटील बोलत होते.  या छोटेखानी कार्यक्रमात कु. शिवानी पाटील, तिची आई  कल्पना अभयसिंग पाटील आणि वडील पत्रकार अभयसिंग राजपूत यांचा केशारिया प्रतिष्ठान व महाराणा उत्सव समितीच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला.

यावेळी समाजाच्या वतीने तसेच माऊली अॅक्वाचे संचालक मुकेश राजपूत व संतोष राजपूत यांच्या वतीनेही सत्कार करण्यात आला. तसेच विमल हॉस्पिटलचे डॉ. सुरजसिंग पाटील व डॉ. स्नेहा पाटील यांनी कु. शिवानी पाटील हिचा सत्कार करून तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. माजी महिला सरपंच सौ. सीमा पंकज चोपडे व पंकज चोपडे यांनीही कु. शिवानीचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.  यावेळी समाजाच्या वतीने तसेच माऊली अॅक्वाचे संचालक मुकेश राजपूत व संतोष राजपूत यांच्या वतीनेही सत्कार करण्यात आला. तसेच विमल हॉस्पिटलचे डॉ. सुरजसिंग पाटील व डॉ. स्नेहा पाटील यांनी कु. शिवानी पाटील हिचा सत्कार करून तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. माजी महिला सरपंच सौ. सीमा पंकज चोपडे व पंकज चोपडे यांनीही कु. शिवानीचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाला महाराणा उत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. विश्वजीत सिसोदिया, केसरिया प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. डी. एस. पाटील, मोयगावचे माजी सरपंच प्रा. महेंद्रसिंग कच्छवाह, उत्सव समितीचे सदस्य रमेशसिंग पाटील, प्रकाश पाटील (तेलर), फत्तेपूरचे ज्येष्ठ मार्गदर्शक नारायण पाटील, भरतसिंग बोऱ्हाडे, गुलाब पाटील, माजी उपसरपंच ईश्वरसिंग पाटील, मणिकराव पाटील, सुभाष पाटील, समाधान राजपूत, युवराज पाटील, दीपक राजपूत, सरदारसिंग पाटील, संतोष पाटील, सोनूसिंग राजपूत, भगवान राजपूत, संतोष लहेनसिंग पाटील, राजेंद्र पाटील, मुकेश पाटील, शुभम राजपूत, राहुल राजपूत, निखिल राजपूत, गोपाल राजपूत, हितेंद्र राजपूत, रतनु राजपूत, गणेश राजपूत, अनिकेत राजपूत, हरीओम राजपूत, सोहम राजपूत यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.

 

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!