अमेरिकन संरक्षणमंत्री ने इराणला डिवचले
म्हणाले, युध्द थांबवण्यासाठी इराण ने केली याचना

प्रतिनिधी | दिल्ली
सर्व जगाची धाकधूक वाढवणारी परिस्थिती एकदाची युध्दविरामा पर्यत पोहचली, त्यामुळे अनेकांनी सुटकेचा श्वास घेतला. या युध्द विरामाला तास ही लोटत नाही तोच अमेरिकेच्या संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांनी युध्द थांबवण्यासाठी इराण ने केली याचना असे वक्तव्य करत इराणला डिवचल्याचे दिसून आले.
पीट हेगसेथ म्हणाले की, इराण हा असहय झाला होता. अपमानीत झाला होता. त्याच्याकडे कोणताच पर्याय उरला नव्हता. त्याचे लष्कर अप्रभावी ठरल्यावर त्यांनी दोन आठवडयासाठी युध्द थांबण्याची याचणा केली. त्यांना कळुन चुकले आहे की, आता करार करण्याशिवाय काहीच पर्याय उरला नाही. ते, पुढे म्हणाले की, अमेरिकेने इराण येथील पुल, उर्जा केंद्र, तेल प्रकल्प यांना लक्ष करण्याचे नियोजन करण्यता आले होते. हे प्रकल्प उध्दस्थ झाले असते तर इराण ला हे प्रकल्प पुन्हा उभे करण्यासाठी अनेक दशके लागली असती असे ही ते म्हणाले.




