मोताळा तालुक्यात १५ कोटींच्या विकास कामांचा शुभारंभ

आमदार  संजुभाऊ गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त पार पडला भूमिपूजन सोहळा

मोताळा
बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार तथा शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख संजुभाऊ गायकवाड यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मोताळा तालुक्यात सुमारे १५ कोटी रुपये किमतीच्या विविध विकास कामांचा भव्य भूमिपूजन सोहळा  २८ मे २०२६ रोजी मोताळा तालुक्यातील विविध ठिकाणी  पार पडला.

आमदार  संजुभाऊ गायकवाड यांच्या शुभहस्ते विकास कामांचे भूमिपूजन पार पडले. वाढदिवसाच्या निमित्ताने तालुक्यातील अनेक गावांमध्ये आमदार गायकवाड यांचा नागरिक, शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांकडून उत्स्फूर्त सत्कार करण्यात आला. या भूमिपूजन सोहळ्यात अंतर्गत रस्ते व ग्रामीण दळणवळण व्यवस्था बळकट करण्यासाठी महत्त्वाच्या रस्ते विकास कामांचा समावेश आहे. यामध्ये पिंपळगाव देवी ते महाळुंगी, महाळुंगी ते धामणगाव बढे, धामणगाव बढे ते कोऱ्हाळा बाजार, कोऱ्हाळा बाजार ते कुऱ्हा, कुऱ्हा ते नळकुंड, नळकुंड ते खामखेड आणि खामखेड ते खडकी या मार्गांचा समावेश असून प्रजिमा क्र. ११३ (०/०० ते १३/६००) या रस्त्याची सुधारणा व मजबुतीकरण करण्यात येणार आहे.
या रस्ते विकास कामांमुळे मोताळा तालुक्यातील ग्रामीण भागातील दळणवळण अधिक सुरक्षित व सुलभ होणार असून शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठा लाभ होणार आहे. बाजारपेठांपर्यंत पोहोच सुलभ होणार असल्याने कृषी मालाच्या वाहतुकीचा खर्च कमी होण्यास मदत होणार आहे.
धामणगाव बढे, गोरनाळा व महाळुंगी येथे पार पडलेल्या भूमिपूजन कार्यक्रमांना शिवसेना, युवा सेना पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, शिवसैनिक, नागरिक तसेच माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण दिसून येत होते.
यावेळी बोलताना आमदार धर्मवीर श्री. संजुभाऊ गायकवाड यांनी सांगितले की, “बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हेच माझे प्रमुख उद्दिष्ट आहे. ग्रामीण भागातील रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण व इतर पायाभूत सुविधांसाठी निधी उपलब्ध करून दर्जेदार कामे पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे.”
वाढदिवसाच्या दिवशीच विकास कामांचा शुभारंभ होत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. वाढदिवस हा केवळ सत्काराचा नसून जनतेसाठी काम करण्याचा दिवस असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी आमदार धर्मवीर श्री. संजुभाऊ गायकवाड यांना दीर्घायुष्य व उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!