जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाच्या जोरावर रोशन चव्हाण यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड

 

मोताळा

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत अथक परिश्रम आणि शिक्षणाच्या बळावर पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) पदाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या मोताळा तालुक्यातील गोतमारा येथील रोशन वामन चव्हाण यांचा अभिता कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) तथा माजी उपजिल्हाधिकारी सुनील शेळके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी रोशन चव्हाण यांचे अभिनंदन करून भावी सेवेसाठी शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रम ५ जुलै रोजी दुपारी पार पडला.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाला दिलेले महत्त्व आजही अनेक कुटुंबांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्याच विचारातून गोतमारा येथील वामन चव्हाण यांनी आपल्या तिन्ही मुलांना शिक्षणाची प्रेरणा दिली. त्यांच्या संस्कारांचे फळ म्हणून मोठा मुलगा अमोल आणि मधला मुलगा सचिन हे पोलीस सेवेत कार्यरत आहेत, तर धाकटा मुलगा रोशन याने पोलीस दलात कार्यरत असतानाच स्पर्धा परीक्षेची तयारी करून पोलीस उपनिरीक्षक पद मिळविण्याचा मान पटकावला. रोशन चव्हाण यांची अवघ्या १९ व्या वर्षी पोलीस दलात भरती झाली होती. नोकरीची जबाबदारी सांभाळत त्यांनी नियमित अभ्यास सुरू ठेवला. सातत्य, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी पोलीस उपनिरीक्षक परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण करून आपल्या कुटुंबासह संपूर्ण गोतमारा गावाचे नाव उज्ज्वल केले. डोंगराळ आणि दुर्गम भागातील गोतमारा तांड्यातील अनेक युवक शिक्षण व नोकरीच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत आहेत. रोशन चव्हाण यांच्या यशामुळे या तांड्याला जिल्ह्यासह राज्यभर नवी ओळख मिळाली असून, ग्रामीण भागातील युवकांसाठी त्यांनी प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.

यावेळी रोशन चव्हाण यांचे वडील वामन चव्हाण, मामा विजय राठोड, प्रेमकुमार राठोड, शौकत शहा तसेच परिसरातील मान्यवर उपस्थित होते.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!