संग्रामपूर येथील बौद्ध भोन स्तूपाचा शोध लावणारे इतिहास संशोधक प्रा. डॉ. देवतारे यांचा नागरी सत्कार आज

संग्रामपूर येथील बौद्ध भोन स्तूपाचा शोध लावणारे इतिहास संशोधक प्रा. डॉ. देवतारे यांचा नागरी सत्कार आज
प्रतिनिधी | बुलडाणा
जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात पूर्णा नदीच्या काठावर वसलेले भोन या गावामध्ये २३०० वर्षांपूर्वीचे सम्राट अशोकाने निर्माण केलेले शहरांचे व प्राचीन बौद्ध स्तूपाचे उत्खनन करून बुलडाणा जिल्ह्याला जागतिक ओळख निर्माण करून देणारे पुण्याच्या डेक्कन कॉलेजच्या प्राचीन भारतीय इतिहास संस्कृती आणि पुरातत्व विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. बी.सी. देवतारे यांच्या नागरी सत्काराचे आयोजन त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने शुक्रवार ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता गोवर्धन सभागृह येथे करण्यात आले आहे.
प्रा.देवतारे यांनी २००३ ते २००७ पर्यंत पूर्णा नदीच्या काठावर असलेल्या प्राचीन भोन गावाचे उत्खनन करून हे गाव एका काळी संपन्न शहर असून दक्षिण व उत्तर जंबोद्वीपाला जोडणारी बाजारपेठ होती. मौर्य काळामध्ये सम्राट अशोकाने या शहराचा विकास करून येथे भव्य बौद्ध स्तूपाची निर्मिती केली होती हे सिध्द केले. बुलडाणा जिल्हा हा ऐतिहासिक व प्राचीन वारसा लाभलेला आहे. हे या उत्खनातून आणि संशोधनातून सिद्ध झाले आहे. नेमकाच त्यांनी केलेल्या भोन उत्खननाच्या अहवाल बेंगलोर येथील एका प्रसिद्ध संस्थेने प्रसिद्ध करून सार्वजनिक केला आहे. ही बाब जिल्हावासियांसाठी अभिमानाची व गौर्यान्वित करणारी आहे. देवतारे यांनी केलेल्या कामाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बुलडाणा जिल्हावासियांच्या वतीने नागरिक सत्कार व भारतीय पुरातत्व विभागाचे जनक मेजर जनरल सर अलेक्झांडर कलिंगम या नावाने पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या स्तुपावर सखोल चर्चा होऊन तो अहवाल जनसामान्य पर्यंत पोहोचावा याकरिता भारतातील प्रसिद्ध इतिहासकार विचारवंत लेखक प्रा.डॉ.विलास खरात यांचे जाहीर व्याख्यान व त्यांनी लिहिलेल्या दोन पुस्तकांचे प्रकाशन या कार्यक्रमात करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन मा.अप्पर जिल्हाधिकारी रमेश घेवंदे हे करणार आहेत. तर प्रमुख उपस्थिती म्हणून प्रसिद्ध लेखक व विचारवंत प्रा. रवींद्र इंगळे चावरेकर,नागपूर विद्यापीठाचे पुरातत्व विभागाचे प्रमुख प्रा.डॉ. प्रियदर्शी खोब्रागडे, इतिहास संशोधक प्रा. डॉ. श्याम देवकर, व्हॉइस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, दिशा अर्बन च्या अध्यक्षा ॲड.जयश्रीताई शेळके, वकील संघाचे जिल्हाध्यक्ष विजय सावळे,मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष रणजीतसिंग राजपूत, सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जैन, प्रसिद्ध लेखिका प्रा. डॉ. विजयालक्ष्मी वानखेडे, आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश्वर उबरहंडे, जामा मस्जिद बुलढाण्याचे इमाम हाफिज रहमत खान, व प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या शाहीना पठाण यांची उपस्थिती लाभणार आहे.
या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त उपासिका संघ व दि बुद्धिस्ट ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्ट बुलडाण्याच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजक कुणाल पैठणकर, प्रा.राजेश खंडेराव, अॅड. राहुल दाभाडे, सुरेश डवरे, आत्माराम चौतमोल, भिकाजी मेढे, मोनिका साळवे, प्रशांत बोर्डे, संजय जाधव, सुरेश घेवंदे,सुरेश सरकटे,प्रा. प्रदीप जाधव,सारिका घेवंदे, सिद्धार्थ आराख,गणेश झोटे,पद्माकर डोंगरे, प्रल्हाद कांबळे, यांनी केले आहे.

ADMIN

आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा ---------------------------- --------- 9822572589 .......... 9767932688 .......... politicslivenews@gmail.com ---------------------------- राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -------

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!