ब्रह्मपुत्रा नदीखाली बोगदा बनणार, रेल्वे-गाड्या धावतील

नवी दिल्ली,

आसाममधील ब्रह्मपुत्रा नदीखाली देशातील पहिल्या रोड-कम-रेल बोगद्यासह फोर लेन एक्सेस-कंट्रोल्ड ग्रीनफिल्ड कॉरिडॉरला मंजुरी देण्यात आली. याची एकूण किंमत ₹18,662 कोटी असेल.  हा भारतातील पहिला आणि जगातील दुसरा अंडरवॉटर रोड-कम-रेल बोगदा प्रकल्प असेल, ज्यात एकाच बोगद्यात रस्ता आणि रेल्वे मार्ग असेल. ट्रेन आणि गाड्या एकाच वेळी धावतील. हा प्रकल्प इंजिनिअरिंग-प्रोक्युअरमेंट-कन्स्ट्रक्शन (EPC) मॉडेलवर विकसित केला जाईल. या प्रकल्पांतर्गत गोहपूर (NH-15) ते नुमालीगड (NH-715) दरम्यान 15.79 किमी लांबीचा बोगदा बांधला जाईल. सध्या नुमालीगड आणि गोहपूर दरम्यान सुमारे 240 किमी अंतर कापायला 6 तास लागतात. या प्रकल्पामुळे कमी वेळ लागेल. सदर निर्णय शनिवारी पार पडलेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!