जळगाव जामोद मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना…

काही तासातच आरोपीला केली अटक, नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन

बुलढाणा

जिल्ह्यातील जळगाव जामोद परिसरात  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेमुळे गावातील वातावरण तणावग्रस्त झाले. या घटनेचे पोलिसांनी तात्काळ दाखल घेत वातावरण निवळण्याचा प्रयत्न केला. हे घटना रविवार सकाळी उघडकीस आली.

जिल्ह्याच्या जळगाव जामोद शहरात  रात्री साडे अकराच्या दरम्यान एका व्यक्तीने डॉ आंबेडकर चौक परिसरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर अंडे फेकून विटंबना केली. ही बाब रविवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी चौकात जमाव करुन या घटनेचा जोरदार निषेध केला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी भेट देवून नागरिकांना शांत करण्याचा प्रयत्न करत परिस्थिती हाताळली, परंतू गर्दी वाढल्याने सदर नागरिकांना रोखने पोलिसांना अवघड गेले. यावेळी पोलिसाांनी तत्काळ चक्र फिरवत आरोपीला काही तासातच अटक केली.

काही तासातच केली आरोपीला अटक

घटनेचे गांभीर्य पाहता पेालिसांनी गतीने तपासाची चक्रे फिरवली. यावेळी परिसरातील  सीसीटीव्ही च्या आधारे पोलिसांनी वाडी खुर्द परिसरातील राहुल विश्राम लांडे नामक चाळीस वर्षे तरुणाला अटक केली.

शहर बंदची हाक

घटने पश्चात परिसरातील  नागरिकांनी शहर बंदची हाक दिली. या हाकेला परिसरातील सर्व व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला.  सध्या शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त पाहायला मिळत आहे.. सोबतच कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, याबाबतीत समाज माध्यमांवर कुठल्याही आक्षेपार्य पोस्ट वायरल करू नये असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे…

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!