लग्नाच्या पंगतीत तरुणावर चाकू हल्ला; कोलवड येथे जुना वाद पुन्हा पेटला

बुलढाणा 

 आनंद आणि उत्साहात रंगलेल्या लग्नसोहळ्याला अचानक हिंसाचाराचे गालबोट लागल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील कोलवड येथे घडली. जुन्या वादातून भर पंगतीत तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात गौरव गजानन जाधव हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कोलवड येथील शिंदे कुटुंबातील लग्नसमारंभात जेवणाचा कार्यक्रम सुरू होता. यावेळी उपस्थित असलेल्या गौरव जाधव आणि नितीन सपकाळ यांच्यात जुना वाद पुन्हा उफाळून आला. कावड यात्रेदरम्यान झालेल्या वादातून दोघांमध्ये आधीपासूनच तणाव असल्याचे सांगितले जात आहे. वाद विकोपाला जाताच संतापलेल्या नितीन सपकाळ याने सोबत असलेल्या मयुरेश दसरकर याच्याकडील चाकू हिसकावून गौरव जाधव यांच्यावर सपासप वार केले. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे लग्नस्थळी एकच गोंधळ उडाला. गंभीर जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या गौरव यांना उपस्थितांनी तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले.

या प्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात नितीन सपकाळ व मयुरेश दसरकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपी फरार झाले आहेत. पोलिसांकडून आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू असून पुढील तपास सुरू आहे.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!