रोहित पवाराने झिरोच्या आधारावर नोंदवला गुन्हा; काय आहे झिरो एफआयआर?

अजित पवार विमान दुर्घटना प्रकरणी कर्नाटक पोलिसात एफआयआर


प्रतिनिधी | बुलडाणा

रोहित पवार यांनी दिवंगत अजित पवार यांच्या विमान दुर्घटना प्रकरणी कर्नाटक पोलिसांकडे ‘झिरो एफआयआर’च्या आधारे गुन्हा नोंदवला आहे. महाराष्ट्रात विविध ठिकाणी तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न करूनही गुन्हा दाखल न झाल्याने अखेर कर्नाटक पोलिसांकडे धाव घेण्यात आली. या प्रकरणात निष्काळजीपणा, कटकारस्थान तसेच पुरावे नष्ट केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले असून, नोंदवलेला ‘झिरो एफआयआर’ पुढील तपासासाठी संबंधित पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.


झिरो एफआयआर म्हणजे काय?
‘झिरो एफआयआर’ ही अशी कायदेशीर सुविधा आहे की, ज्यामुळे गुन्हा ज्या ठिकाणी घडला आहे त्या क्षेत्राचा विचार न करता, कोणत्याही जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवता येते. अशा प्रकारे नोंदवलेल्या एफआयआरला सुरुवातीला ‘0’ क्रमांक दिला जातो आणि नंतर तो संबंधित पोलीस ठाण्याकडे वर्ग केला जातो. या व्यवस्थेमुळे तक्रारदाराला विलंब न होता त्वरित न्यायप्रक्रिया सुरू करता येते, विशेषतः अपघात किंवा तातडीच्या घटनांमध्ये ही पद्धत अत्यंत उपयुक्त ठरते.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!