बँकॉकहून पुण्यात आला हायड्रोपोनिक गांजा

प्रवाशाला अटक, कस्टम विभागाची कारवाई

प्रतिनिधी | मनीष अग्रवाल

पुणे विमानतळावर कस्टम विभागाने मोठी कारवाई करत बँकॉकहून आलेल्या एका प्रवाशाकडून तब्बल 33.60 लाख रुपये किमतीचा हायड्रोपोनिक गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी अंजिल मुथिप्पलाथिंकल मजीद (वय 20, रा. त्रिशूर, केरळ) याला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अंजिल मजीद बँकॉकहून एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाने पुण्यात आला होता. विमानतळावर उतरल्यानंतर कस्टम विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटला त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. त्यामुळे अधिकाऱ्यांनी त्याला थांबवून तपासणी केली. सुरुवातीला वैयक्तिक झडती घेतली असता काहीही आढळले नाही, मात्र त्यानंतर त्याच्या सामानाची सखोल तपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान, आरोपीच्या बॅकपॅकमध्ये कपड्यांमध्ये लपवून ठेवलेली दोन पारदर्शक पॅकेट्स सापडली. ही पॅकेट्स कार्बन पेपरमध्ये गुंडाळून व्हॅक्यूम सील करण्यात आली होती. यामुळे गांजाचा वास बाहेर येऊ नये आणि स्कॅनिंग यंत्रणेतूनही तो सहज सुटावा, असा आरोपीचा प्रयत्न होता. मात्र, कस्टम अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे त्याचा हा डाव फसला.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!