बुआबाजी प्रकरणात सामिल असलेल्या लोकप्रतिनिधीवर कारवाईची मागणी ; माकप कडून आंदोलनाचा इशारा

प्रतिनिधी | बुलडाणा
नाशिक येथे उघडकीस आलेल्या बुआबाजी प्रकरणात अनेक नामवंत लोकप्रतिनिधीचा समावेश आहे. या लोकप्रतिनिधीवर तत्काळ कारवाई करण्यात यावी, अन्यथा राज्यभरात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माकपच्यावतीने देण्यात आला. या संदर्भात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षवतीने उपविभागीय अधिकारी यांना ६ एप्रिल रोजी निवेदन देण्यात आले.
या निवेदनात माकपच्यावतीने आरोप करण्यात आला आहे की, राज्यातील विविध भागांत भोंदू बाबांची संख्या वाढत असून, ते भोळ्या नागरिकांची फसवणूक करून आर्थिक व मानसिक शोषण करत आहेत. विशेषतः महिलांच्या शोषणाच्या घटना गंभीर स्वरूप धारण करत आहेत. या भोंदूबाबांना अनेक लोकप्रतिनिधीचा वरदहस्त ही मिळला आहे, त्यामुळे जनतेचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे. समाजाची फसवणूक व शोषण करणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरात व त्यांच्या सहकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, या प्रकरणात सहभागी असलेल्या संबंधित लोकप्रतिनिधींची नावे जाहीर करावीत, पीडित महिलांचे व्हिडिओ तात्काळ सोशल मीडियावरून हटवावेत, राज्यभरातील भोंदू बाबांविरोधात विशेष मोहीम राबवण्यात यावी, प्रत्येक पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करावा, जादूटोणा विरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात यावी, सोशल मीडियावरील अंधश्रद्धा पसरवणाऱ्या जाहिरातींवर बंदी आणावी आदी मागण्या करण्यात आल्या आहे.
यावेळी माकपचे जिल्हा सचिव कॉ. अनिल गायकवाड, जिल्हा कमिटी सदस्य कॉ. जितेंद्र चोपडे, जिल्हा कमिटी सदस्य कॉ. विप्लव कवीश्वर, वसंत चोपडे, महेश वाकदकर, रामचंद्र भारसाकळे, रितेश चोपडे, आदित्य इंद्रजित अादी मान्यवर उपस्थित होते.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!