अमोनियम नायट्रेट वाहतूक करणाऱ्या ट्रँकरला गळती
समृध्दी महामार्गाच्या नागपूर कॉरिडॉर वरील वाहतूक सहा तास ठप्प; परिस्थिती नियंत्रणात

प्रतिनिधी | सिंदखेडराजा::
मुंबई हून नागपूर कडे लिक्विड अमोनियम नायट्रेट वायू वाहतूक करणाऱ्या ट्रँकरला समृध्दी महामार्गाच्या नागपूर कॉरिडॉरवरील चॅनल क्रमांक 360 जवळ गळती लागल्याने या कॉरिडॉर वरील वाहतूक सहा तास ठप्प होती तर नागपूर कडे जाणाऱ्या वाहनांना जाळण्यातून वळण देण्यात आले. मंगळवारी सकाळी 11 वाजता सदर घटना घडली.
मुंबईतील वळोजा भागातून अमोनियम नायट्रेट लिक्वीड वायू घेऊन जाणारा धावत्या ट्रॅकर गळती लागली, जालन्याच्या जामवाडी शिवारातील समृद्धीच्या पॅकेज 7 मधील चॅनल क्रमांक 360 जवळ झालेल्या या घटनेनंतर चालकाने ट्रॅकर जागेवरच थांबवला घटनेची माहिती महामार्ग पोलिसांना देण्यात आल्यानंतर जालन्यातील महामार्ग पोलिस अधिकारी,अग्निशमन अधिकारी,कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन नागपूर कॉरिडॉर वरील वाहतूक जालन्यातील नियमित महामार्गाने वळविली.जालना जिल्हाधिकारी,महामार्ग पोलिस अधिक्षक,जालन्यातील अप्पर पोलिस अधिक्षक आदींनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.दरम्यान, क्रेनच्या मदतीने गळती लागलेला ट्रॅकर जामवाडी शिवारातील जंगल भागात नेण्यात आल्या नंतर सर्व सुरक्षेची पडताळणी करून दुपारी पाच वाजता वाहतूक सुरळीत सुरू करण्यात आली.




