इंधन दरवाढीविरोधात शिवसेनेचे आंदोलनाचे संकेत

शेतकऱ्यांना डिझेल थेट कॅनमध्ये देण्याची मागणी

प्रतिनिधी | जळगाव जामोद
पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर आणि खाद्यतेलाच्या सतत वाढणाऱ्या दरामुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी वर्ग आर्थिक अडचणीत सापडला असून, या महागाईविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. पक्षाच्या वतीने २१ मे रोजी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करून वाढीव दर तातडीने कमी करण्याची मागणी करण्यात आली.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळत नसताना इंधन दरवाढीमुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च प्रचंड वाढला आहे. शेती मशागतीसाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रॅक्टर साठी डिझेल थेट कॅनमध्ये उपलब्ध करून देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. महागाईसोबतच ‘नीट’ (NEET) परीक्षेतील कथित गैर प्रकारांचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला. महाराष्ट्रातील काही कोचिंग क्लासेस तसेच पेपरफुटी प्रकरणात सहभागी असलेल्या पालक आणि विद्यार्थ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आल्यास उबाठा गटाच्यावतीने जिल्हाभर तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
यावेळी जिल्हा प्रमुख गजानन वाघ, दत्ता पाटील, तुकाराम काळपांडे, भीमराव पाटील, शुभम पाटील, रमेश ताडे, पुंडलिक पाटील, मो. फारुख, संजय दंडे, विशाल ताकोते, शांताराम धोटे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!