मराठवाडा-विदर्भात अवकाळी पावसाचा इशारा;  पुढील 24 तासात अवकाळी पावसाचा तडाका 

बुलडाणा,

राज्यातील मराठवाडा आणि विदर्भ भागात पुढील काही दिवस अवकाळी पाऊस, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे आधीच उष्णतेने त्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार असला, तरी शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. हवामानातील अचानक बदलामुळे अनेक जिल्ह्यांत ढगाळ वातावरण निर्माण झाले असून काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. दरम्यान, वादळी वाऱ्यांसह विजांचा धोका लक्षात घेता नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी काढणीस आलेले पीक, भाजीपाला व फळबागांचे संरक्षण करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!