लोणारच्या आध्यात्मिक परंपरेला आमदार सिद्धार्थ खरात यांचा मोठा हातभार,  श्री समर्थ खटकेश्वर महाराज संस्थानासाठी 30 लाखांचा निधी

लोणार,

येथील श्री समर्थ खटकेश्वर महाराज संस्थान आयोजित अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रमात आमदार सिद्धार्थ खरात यांनी अध्यात्म आणि सामाजिक बांधिलकीची सांगड घालत संस्थानासाठी आमदार निधीतून तब्बल 30 लाख रुपयांचा निधी जाहीर केला. त्यांच्या या घोषणेमुळे उपस्थित भाविकांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

अखंड हरिनाम सप्ताहाच्या समारोपप्रसंगी बोलताना आमदार खरात म्हणाले की, लोणारची भूमी संत-महंतांच्या विचारांनी पावन झालेली असून वारकरी संप्रदायाने समाजाला संस्कार, समता आणि अध्यात्माची दिशा दिली आहे. समाजप्रबोधनाचे कार्य करणाऱ्या धार्मिक आणि सामाजिक संस्थांना शासनस्तरावरून अधिक बळ देणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.‌ यावेळी प्रसिद्ध हरिभक्त परायण संजय महाराज पाचपोर यांच्या काल्याच्या कीर्तनाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. त्यांच्या ओजस्वी कीर्तनातून समाजात समतेचा, नम्रतेचा आणि संस्कारांचा संदेश देण्यात आला. उपस्थित भाविक मंत्रमुग्ध होऊन हरिनामाच्या गजरात सहभागी झाले होते.
कार्यक्रमात महिलांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती पाहून समाधान व्यक्त करत आमदार खरात म्हणाले की, आपली संस्कृती आणि परंपरा टिकवून ठेवण्यात महिला वर्गाचे मोठे योगदान आहे. त्यांच्या सक्रिय सहभागामुळे समाजातील आध्यात्मिक वातावरण अधिक दृढ होत आहे.  संस्थानच्या सभागृहासाठी 30 लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा करताना त्यांनी यावर्षी 15 लाख आणि पुढील वर्षी आणखी 15 लाख रुपये उपलब्ध करून दिले जातील, असे स्पष्ट केले. या निधीतून संस्थान परिसरातील विकासकामे, भाविकांसाठी आवश्यक सुविधा तसेच धार्मिक उपक्रमांना मोठी चालना मिळणार आहे. यावेळी आमदार सिद्धार्थ खरात यांनी स्वतः पणतीत महाप्रसाद वाढत साधेपणाचा आदर्श घालून दिला. त्यांच्या या कृतीचे उपस्थित भाविकांनी विशेष कौतुक केले.
कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, संस्थानचे विश्वस्त अध्यक्ष, तालुकाप्रमुख राजूभाऊ बुधवत, प्रा. गजानन खरात, विठ्ठलराव नागरे, परमेश्वर दहातोंडे, बंडू जोगदंड, सुभाष सोनुने. महिला आघाडीच्या सौ. तारामती जायभाये आदी मान्यवर उपस्थित होते. यांच्यासह वारकरी संप्रदायातील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
आमदार खरात यांच्या निधी घोषणेचे उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले. राम कृष्ण हरी च्या अखंड गजरात संपन्न झालेल्या या कार्यक्रमामुळे संपूर्ण लोणार परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता.

ADMIN

आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा ---------------------------- --------- 9822572589 .......... 9767932688 .......... politicslivenews@gmail.com ---------------------------- राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -------

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!