लोणारमध्ये अवैध प्रवासी वाहतुकीचा विळखा

जीप, ट्रॅक्स आणि ऑटोमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी; प्रशासनाच्या भूमिकेवर नागरिकांचा सवाल

लोणार

जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळख असलेल्या लोणार शहरात आणि परिसरातील ग्रामीण मार्गांवर अवैध प्रवासी वाहतूक दिवसेंदिवस बोकाळत असून प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. परिवहन मंडळाच्या अपुऱ्या आणि विस्कळीत बससेवेचा फायदा घेत काही खाजगी वाहनधारकांकडून नियमांना हरताळ फासत प्रवाशांची वाहतूक केली जात असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे.

      ग्रामीण भागात धावणाऱ्या जीप, ट्रॅक्स आणि ऑटो रिक्षांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरले जात असून चालकाच्या दोन्ही बाजूंना तसेच वाहनांच्या टपावरही प्रवाशांना बसवले जात आहे. जीव धोक्यात घालून सुरू असलेल्या या वाहतुकीमुळे मोठा अपघात होण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. अनेक वाहनांमध्ये लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनाही अक्षरशः कोंबून नेले जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.  विशेष म्हणजे शहरातील मुख्य चौक, बस स्थानक परिसर आणि प्रमुख रस्त्यांवर ही वाहने उघडपणे प्रवासी भरताना दिसत असूनही संबंधित यंत्रणा प्रभावी कारवाई करत नसल्याची नाराजी नागरिकांमधून व्यक्त होत आहे. परिवहन विभागाकडून वेळोवेळी नियमांचे पालन करण्याचे आदेश दिले जात असले, तरी प्रत्यक्षात मात्र परिस्थितीत कोणताही बदल दिसून येत नसल्याचा आरोप होत आहे.  स्थानिक पोलीस आणि आरटीओ प्रशासनाकडून अधूनमधून कारवाई केली जात असली, तरी ती केवळ औपचारिक स्वरूपाची असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. रोज सर्रास सुरू असलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून प्रशासनाने कठोर मोहीम राबविण्याची मागणी होत आहे.

दरम्यान, या प्रश्नावर स्थानिक लोकप्रतिनिधींनीही लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे. वाढत्या अवैध प्रवासी वाहतुकीमुळे भविष्यात गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने संबंधित विभागांनी तातडीने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

ADMIN

आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा ---------------------------- --------- 9822572589 .......... 9767932688 .......... politicslivenews@gmail.com ---------------------------- राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -------

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!