धक्कादायक! घरात घुसून महिलेचा विनयभंग;

जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल

 धामणगाव बढे

अलीकडे महिला सुरक्षित नसल्याच्या घटनांमुळे समाजमन अस्वस्थ होत चालले आहे. अशीच एक संतापजनक घटना मोताळा तालुक्यातील एका गावातून समोर आली आहे. घरात आपल्या मुलीसोबत झोपलेल्या एका महिलेचा जबरदस्तीने हात पकडून, अश्लील शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका ४० वर्षीय आरोपीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. किशोर आत्माराम मख (वय ४०, रा. पोखरी ता. मोताळा जि. बुलढाणा) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ५ जुलै रोजी पीडित महिलेने यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. घटनेच्या दिवशी पीडित महिलेचे पती हे हरण शेती पिकांचे नुकसान करतात म्हणून शेतात चक्कर मारायला गेले होते. पती थोड्या वेळात घरी परतणार असल्याने, फिर्यादी महिलेने घराचे दार लोटून घेतले आणि ती आपल्या मुलीसोबत घरात झोपली होती.

दरम्यानच्या काळात, आरोपी किशोर आत्माराम मख याने महिलेच्या घरात अनाधिकृतपणे प्रवेश केला. महिला झोपलेली असताना आरोपीने तिचा उजवा हात जबरदस्तीने व वाईट उद्देशाने पकडला. इतकेच नव्हे तर, तिला अश्लील शिवीगाळ करत लोटपोट केली आणि जिवे मारण्याची धमकीसुद्धा दिली, असे पीडितेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

 

विविध कलमान्वये गुन्हा दाखल

पीडित महिलेने दिलेल्या या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी किशोर मख याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ७४, ३३३, २९६, ३५१(३) आणि ११५(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या धक्कादायक प्रकरणाचा पुढील तपास सफौ सुरेश सोनवणे करत आहेत.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!