रुजू होताच उपविभागीय अधिकारी ॲक्शन मोड मध्ये ; अवैध रेती वाहतूक करणारी वाहने पकडली

 

गोपाल तोष्णीवाल | लोणार

लोणार आणि परिसरातून रात्रीच्या आणि पहाटेच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर अवैध रेतीची वाहतूक होत असल्याची बातमी वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आली होती. या बातमीची गंभीर दखल घेत, लोणार मध्ये  नव्याने रुजू झालेले उपविभागीय अधिकारी सानप यांनी  धडक मोहीम राबवून अवैध रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांवर थेट रस्त्यावर उतरून मोठी कारवाई केली.

लोणार परिसरातील मुख्य रस्त्यांवरून महसूल प्रशासनाची नजर चुकवून रेतीची अवैध वाहतूक सुरू असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. बातमी समोर येताच, उपविभागीय अधिकारी सानप यांनी  नायब तहसीलदार मयूर इप्पर, ग्राम महसूल अधिकारी सचिन शेवाळे  आदी   महसूल विभागाच्या पथकासह तातडीने मंठा रोड येथे नाकाबंदी केली. या अचानक केलेल्या नाकाबंदीमुळे अवैध रेती वाहून नेणाऱ्या चालकांमध्ये एकच खळबळ उडाली.  या धडक कारवाई दरम्यान, कोणतीही वैध रॉयल्टी कागदपत्रे नसलेले अवैध रेतीचे डंपर प्रशासनाने रंगेहात पकडले. अधिकाऱ्यांनी वाहन जप्त करून पोलीस ठाण्यात लावले आहे. या कारवाईमुळे तालुक्यातील रेती माफियांचे धाबे दणाणले आहेत.

कायद्याचा बडगा: कडक दंडात्मक कारवाईचे आदेश

प्रथमच पदभार घेतलेल्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी दाखवलेल्या या सिंघम स्टाईल तत्परतेचे लोणारकरांकडून जोरदार स्वागत होत आहे. जप्त केलेल्या वाहनांवर लाखो रुपयांचा दंड ठोकण्याची आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. “अवैध रेती उपसा आणि वाहतूक करणाऱ्यांची गय केली जाणार नाही,” असा इशारा प्रशासनातर्फे देण्यात आला आहे.

 

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!