लोणार सरोवर, पर्यटन स्थळ, रामसर, व अभयारण्यचा दर्जा काढून घेण्यात यावा – राजेश मापारी

लोणार
लोणार सरोवराचा अ वर्ग पर्यटन स्थळ दर्जा, रामसर साईटच्या दर्जा व अभयारण्यचा दर्जा काढून घेण्यात यावा अशी मागणी जिल्हा सरचिटणीस काँग्रेस कमेटी बुलडाणाचे राजेश श्रीराम मापारी यांनी केली. या संदर्भात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी,केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत,पर्यटनमंत्री महाराष्ट्र राज्य आदिती तटकरे यांना निवेदन पाठवले आहे.
या निवेदनात मापारी यांनी आरोप केला आहे की, लोणार सरोवर वैज्ञानिक दृष्ट्या अती महत्वाचे आहे. विविध प्रकारच्या वनस्पती विविध प्रकारचे पक्षी या सरोवरामध्ये आहेत. यामुळे भारत सरकारने सुध्दा अभयारण्याचा दर्जा दिला आहे. या ठिकाणी असणाऱ्या पाणी साठ्यामुळे या ठिकाणाला पाणसर ठिकाण म्हणून सुध्दा दर्जा दिला आहे.
शहरातील ४ स्मारके हे राष्ट्रीय स्मारके घोषीत करण्यात आली. यामधील ३ राष्ट्रीय स्मारके हे गावामध्ये आहेत. या स्मारकाजवळ ४ पिढ्यापासुन लोकांची घरे आहेत. एका स्मारकाजवळ गरीब लोकांनी अतिक्रमण करून घरे बांधली आहेत.तर काही लोकांना जुनी घरे पाडुन पुन्हा बांधायची तर यांना १०० मीटर पर्यत कोणतेच काम करता येत नाही या गरीब लोकांना पंतप्रधान घरकुल योजने अंतर्गत घरे मिळाली परंतु शासनाच पुरातत्व विभाग या लोकांना घरे बांधण्यासाठी मनाई करते. या गरीब लोकांनी कोणाकडे न्याय मागायचा यांची घरे १०० वर्षापासून आहेत व या ३ राष्ट्रीय स्मारके नंतर झाली. या गरीब लोकांना शासनाने मोबद्दला देऊन स्थालातरीत करायला हवे किंवा या लोकांना राहण्यासाठी बांधकाम परवानगी तरी देण्यात यावी. सरोवराची ओळख हे खाऱ्या पाण्याचे सरोवर म्हणून केली जाते. सरोवरची पाण्याच्या पी.एच. १२% ते १४ % एवढ्या होता, काठावर जुने हेमांड पंथी १२ मंदीरे होती मंदीराकडे लक्ष न दिल्यामुळे ते त्याच ठिकाणी कोसळुन पडली आहेत. धारतिर्थ व सितान्हानी या ठिकाणा वरून येणारे पाणी हे शेतकरी आपल्या शेतामध्ये वापर करत होते. अभयारण्य घोषीत झाल्यानंतर शेती बंद करण्यात आली. या पाण्याचा कोणत्याच प्रकारचा वापर न केल्यामुळे हे पाणी या सरोवराच्या पाण्यात मिसळू लागले आहे. ही प्रक्रिया २०२२ पासून मोठ्या प्रमाणात सुरू झाली. यामुळे हे खाऱ्या पाण्याचे सरोवर होण्यासाठी हजारे वर्षे लागले ते सरकारच्या अनर्थमुळे गोडे होऊ लागले आहे सद्या पाण्याची पी.एच. १% ते६ % ऐवढी राहीली आहे. जुन्या काळात पाण्याच्या वेगळा गुणधर्मामुळे कोणत्याही प्रकारचे त्वच्या रोग दुरूस्त होत होते. या पाण्यात कोणताच जिवजंतु जिवत राहु शकत नव्हता या ठिकाणी या पाण्याच्या गुणधर्मामुळे (Blue) Green-Algi हे शेवाळ विकसीत झाले होत त्यामध्ये Speruluna नावाचे घटक होता. न्युटेशनसाठी वापरात आणता आला असता यामुळे कुपोषीत बालकासाठी जे न्युटीयट भारताला बाहेरून आणावे लागते ते वाचले असते परंतु वन विभागाच्या चुकीमुळे हे मोठे नुकसान भारत सरकारला झाले आहे. या ठिकाणावरील पाण्याची पातळी वाढल्यामुळे काठावरील सर्व मंदीरे पाण्यात गेली आहेत. हे पाणी काढण्यासाठी कोणताच विभाग प्रत्यक्ष काम न करता फक्त कागदावर काम करत आहेत. यामुळे या ठिकाणावरील परिसंस्था सुध्दा नष्ट होत आहे.
या विरजतिर्थामध्ये आंघोळ केल्यावर गंगेला गेल्याचे पुण्य लागते अशी जनभावना होती. या ठिकाणी आंघोळ करण्यासाठी दुरवरून लोक येत होती. करोना काळात पुरातत्व विभागाने या ठिकाणी आंघोळ करण्यासाठी बंदी घातली. करोना संपल्यानंतर सुध्दा वारंवार या विभागाला विनंती केली परंतु अद्याप पर्यंत या ठिकाणी आंघोळ करण्यासाठी परवानगी देण्यात आली नाही. लोणार सरोवर या ठिकाणी क वर्ग नगर पालिका आहे. या ठिकाणावरील या ४ राष्ट्रीय स्मारका शेजारी जे हजारो लोक राहतात त्यांना आता बांधकाम परवानगी दिली जात नाही यामधील लोक मोठ्या प्रमाणात दारिद्र्यरेषेखाली आहेत या लोकांना १०० मिटर मध्ये बांधकाम करता येत नाही अशा लोकांसाठी ९०० घरकुले बांधकाम करून घेतले होते. यापैकी ४०० घरे बांधुन गरीब लोकांना वाटप सुध्दा केली आहेत. परंतु अद्यापही ५०० घरकुले अर्धवट पडून आहेत या वरती शासनाने लाखो रू. खर्चे केले परंतु सदर घरकुले अर्धवट असल्यामुळे या ठिकाणारील लोकांना स्थालातरीत करत येत नाही शासन म्हणते ही योजना बंद झाली आहे. हे घरे १५ वर्षापासुन अर्धवट पडून आहेत शासनाच्या पैसा वाया गेला आहे. नवीन निधी देण्यास शासन तयार नाही.
अशा प्रकारे लोणार शहरातील लोकांना मोठ्या अडचणी ठरत आहेत. त्याच्या मुलभूत हक्कावर सुध्दा गंदा येत आहे. यापैकी जुने होते ते योग्य होते आज सरोवर नष्ट होत आहे. धार्मीक पर्यटन बंद झाले आहे. या ठिकाणी पर्यटकांच्या बांधकामातुन निर्माण होणारा रोजगार उपलब्ध होत नाही. फक्त अधिकाऱ्यांना पैसे खाण्याचे सुरण निर्माण होत आहे.ऐवढा जागतीक ठेवा नष्ट होत असतांना पाहुन दुःख होत आहे. यासाठी लोणार सरोवराच्या अ वर्ग पर्यटन स्थळ दर्जा,रामसर साईटच्या दर्जा, अभयारण्याचा दर्जा काढून घेण्यात यावा व सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यात यावा अशी मागणी राजेश मापारी यांच्या कडून करण्यात आली आहे.

ADMIN

आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा ---------------------------- --------- 9822572589 .......... 9767932688 .......... politicslivenews@gmail.com ---------------------------- राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -------

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!