ऑपरेशन टायगरला ठाकरे सेनाच जबाबदार – खा. प्रतापराव जाधव

 

बुलडाणा

ठाकरे गटाचे खासदार फुटत असतील, तर त्याला स्वतः उबाठा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट आणि त्यांचे नेतृत्वच जबाबदार आहे,” असा थेट आरोप खासदार प्रतापराव जाधव यांनी केला आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात 2022 नंतर पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाची चिन्हे आहेत. कारण उद्धवसेनेच्या 9 पैकी 6 खासदारांनी स्वतंत्र गट स्थापनेची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी ते बुधवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांना पत्र देऊ शकतात. त्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी रात्री उशिरा दिल्लीला रवाना झाले असल्याची माहिती आहे. दरम्यान संजय  राऊत यांनी मध्यरात्री केलेल्या 15 कोटींच्या ॲडव्हान्स’च्या आरोपांना उत्तर देताना प्रतापराव जाधव म्हणाले की, मूळ समस्या ही खासदारांबद्दलच्या नेतृत्वाच्या दृष्टिकोनात आहे. तिथल्या लोकप्रतिनिधींना वारंवार संशयाच्या नजरेने पाहिले जाते. कुणाशी बोलायचे, कुणाला भेटायचे आणि कुणाच्या घरी जेवायला जायचे, यावरही पाबंद्या घातल्या जातात. या अशा जाचाला खासदार आता पूर्णपणे कंटाळले आहेत आणि त्यांच्यातील असंतोष कधीही बाहेर पडू शकतो असा दावा जाधव यांनी केला आहे.

 

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!