पुरात रस्ता वाहून जाण्याच्या भीतीने गावाकऱ्यात दहशत
ब्रह्मपुरी, वाडी, ग्रामस्थांची डोकेदुखी वाढली

किन्होळा
किन्होळा, केळवद पैनगंगा नदीवर पुलाचा काम प्रगतीपथावर असताना २४ जून रोजी दिवसा ११ ते ४ सुमारास दमदार पावसामुळे पुर आला होता. या पुरात उभा करण्यात आलेला पर्यायी मार्ग वाहून जातो की काय या भीतीने गावकऱ्यात दहशत पसरली आहे.
मागील काही महिन्यापासून श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय जवळील पैनगंगा नदीवरील जुना पुल खोदून नवीन पुलाचे काम करण्यात येत आहे. या ठिकाणी ठेकेदाराच्या वतीने पर्यायी मार्ग निर्माण करण्यात आलेला आहे. सदर पर्यायी मार्ग पावसाळ्यात कायम सुस्थितीत राहावा, यासाठी पाइप टाकून दोन्ही बाजूला काँक्रीटच्या भिंती घेऊन खडीकरण करण्याबाबत ठेकेदाराला सूचना दिल्या होत्या, मात्र ठेकेदारांने पाईप टाकून मुरूम रस्ता तयार केला. त्यामुळे सदर पर्यायी मार्ग हा तकलादू बनला आहे. भर उन्हाळ्यात सुद्ध या पुलाचे काम पूर्ण करण्यात आले नाही. मागील काही दिवसापासून परिसरात मुसळधार पाउस कोसळू लागला आहे. या पावसाच्या पाण्यात सदर पर्यायी मार्ग वाहून जातो की काय अशी भिती सतत गावकऱ्यात व्यक्त केली जात आहे. त्या मुळे पावसाळा सुरु होताच नागरिकांची व प्रवाशांची डोकेदुखी वाढली आहे.
पुलाचे काम करणाऱ्या ठेकेदाराने पर्यायी रस्ता म्हणून दुसरा मार्ग काढला होता. या पर्यायी रस्त्याने वाहतुक करण्यात येत होती. दरम्यान, २४ जून झालेल्या दमदार पावसामुळे पैनगंगा नदीला पूर आला. या पुरात पाण्याची पातळी वाढल्याने पर्यायी रस्ता वाहुन जाण्याची दाट शक्यता आहे’ मागील वर्षी देखील याच पद्धतीने घटना घडल्याने रस्ता वाहून गेला होता त्यामुळे वाहतूक ठप्प पडली होती परिणामी गावकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला होता.




