मोताळा माझा काळजाचा तुकडा – संजय गायकवाड

मतदारसंघ पुनर्रचनेच्या चर्चांवर आमदार संजय गायकवाड यांचे स्पष्ट विधान

बुलडाणा
विधानसभा मतदारसंघातून मोताळा तालुका वेगळा केला जाण्याच्या चर्चांना आमदार संजय गायकवाड यांनी आज पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. “मोताळा हा माझ्या काळजाचा तुकडा आहे. कोणत्याही परिस्थितीत मोताळा बुलडाणा विधानसभा मतदारसंघापासून दूर होणार नाही,” असे ठाम विधान त्यांनी केले.
जिल्हयात मागील काही दिवसापासून मतदारसंघांच्या संभाव्य पुनर्रचनेच्या पार्श्वभूमीवर विविध स्तरांवर चर्चा सुरू आहे. जिल्हयातील खामगाव हा जर दुसरा जिल्हा झाला तर मोताळा हा खामगाव जिल्हयाला जोडला जाईल व मोताळयाचा विकास रखडेल अशी चर्चा नागरिकात आहे. दरम्यान या प्रश्नाला उत्तर देतांना बुलडाणा विधानसभा मतदार संघाचे आमदार संजय गायकवाड यांनी आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार करतांना सांगितले की मोताळा तालुक्याशी आपले भावनिक आणि विकासात्मक नाते आहे. या भागात अनेक विकासाची कामे अजून करावयाची आहे, या भागातील जनतेच्या हितासाठी आपण कायम आग्रही राहणार असून मोताळा हा माझा काळजाचा तुकडा आहे, तो बुलडाण्यापासून मी कोणत्याही परिस्थितीत दूर होवू देणार नाही.या भागातील नागरिकांनी अनेक कष्टाची दिवस काढले आहे, या भागातील दुष्काळ मला दुर करावयाचा आहे. त्यामुळे खामगाव जिल्हा जरी झाला तरी मोताळा तालुका बुलडाणा विधानसभा मतदारसंघातच राहावा, यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!