विकासासाठी जाती-पातीचे राजकारण केले नाही – आ. डॉ. संजय रायमुलकर

वीरशैव लिंगायत समाजाच्या सामाजिक सभागृहाचे लोकार्पण पडले पार

 

 

लोणार

लोणार शहरासाठी मागील काही वर्षात मोठया प्रमाणात विकासनिधी आणण्यासाठी मी प्रयत्न केला. या निधीतून विविध समाजासाठी विकासकामे मार्गी लावण्यात आली, सदर कामे करतांना मी कधीच जातीपातीचे राजकारण केले नाही, असे प्रतिपादन माजी आमदार डा. संजय रायमुलकर यांनी केले.

ते, लोणार येथील वीरशैव लिंगायत समाजाच्या बहुप्रतीक्षित श्रीपद जगद्गुरू पलसिद्ध महास्वामी सभागृहाचे लोकार्पण प्रसंगी बोलत होते. हा कार्यक्रम बुधवारी माजी आमदार डॉ. संजय रायमुलकर यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमास शिवछत्रमित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नंदकिशोर मापारी, सरपंच संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अरुणमामा दळवी, मिराताई मापारी लोणार नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा, माजी नगराध्यक्ष विद्यमान नगरसेवक भूषणभाऊ मापारी, न पा चे उपाध्यक्ष आबेद खान, बांधकाम सभापती अनिकेत राजेश मापारी, शिवसेनेचे गटनेते व नगरसेवक मयुर रमेशचंदजी गोलेच्छा, नगरसेवक गजानन शालीकराम मापारी, अक्षय नंदकुमार इंगळे, काँग्रेसचे गटनेते नितीनभाऊ शिंदे,भाजपचे नगरसेवक शुभम देसाई यांच्यासह समाजातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना आ. डॉ. रायमुलकर म्हणाले की, मतदार संघाचा आमदार म्हणून काम करत असताना तत्कालीन मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख आ. एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने आणि केंद्रीय मंत्री खा प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मेहकर विधानसभा मतदारसंघासाठी सुमारे २,५०० कोटी रुपयांचा विकास निधी मागील दोन वर्षात मंजूर करून आणण्यात आला. या निधीतून लोणार व मेहकर तालुक्यात विविध समाजांसाठी सामाजिक सभागृहे, सभामंडप तसेच लोणार येथील जैन समाजाच्या वर्धमान गौरक्षण संस्थेच्या ७ एकर जागेस संरक्षण भिंत व सामाजिक सभागृहासाठी २ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.विकासकामे करताना मी कधीही जाती-पातीचे राजकारण केले नाही. नगरपालिकेत कोणत्याही पक्षाची सत्ता असो शहराच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने मी प्रामाणिक प्रयत्न केले. जिथे विकासाची गरज होती, तिथे निधी पोहोचविण्याचे काम मी तत्काळ केले,” आ असो किंवा नसो सत्ता आपली आहे आणि नगरविकास खाते हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे त्यामुळे मेहकर मतदारसंघात विकासाची गती कायम राहणार आहे. शिंदे मुळेच मेहकर विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्रातील सर्वाधिक ११७ तलाठी कार्यालयांची कामे पूर्ण झाल्याचे सांगत त्यांनी मतदारसंघातील जनतेने दिलेल्या प्रेम आणि विश्वासामुळेच विकासाची अनेक कामे करता आली, अशी भावना व्यक्त केली.

कार्यक्रमास वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष मंगेश शेटेसर, विश्वनाथकाका जितकर, माजी नगरसेवक डॉ. डुकळे, अच्युत अप्पा बेंद्रे, संजय अप्पा खडक्कर, कमलेश शेटे, अशोक अप्पा खडक्कर, ओकारअप्पा खूपसे, रमेशअप्पा भुक्कन, रविभाऊ भोजपत्रे, यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मंगेश शेटे सर यांनी केले

 

 

 

रमेशअप्पा केळकर यांच्या जागादानातून साकारले समाजाचे स्वप्न

वीरशैव लिंगायत समाजाकडून अनेक वर्षांपासून लोणार येथे सामाजिक सभागृहाची मागणी होत होती. मात्र जागेअभावी कामाला विलंब झाला. समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते रमेशअप्पा केळकर यांनी कोणताही मोबदला न घेता सभागृहासाठी स्वतःच्या मालकीची जागा उपलब्ध करून दिली. त्यांच्या या उदात्त योगदानामुळे समाजासाठी भव्य सभागृह साकार होऊ शकले, ही आनंदाची बाब असल्याचे मा. आ रायमुलकर सांगितले. यावेळी त्यांचा सपत्नीक सत्कार ही करण्यात आला.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!