आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक विजेता सागर बोर्डे यांचा मा. पोलीस अधीक्षक कार्यालयात सत्कार; प्रशस्तीपत्र देऊन गौरव

बुलढाणा
जिल्ह्याचे आंतरराष्ट्रीय लॅक्रॉस खेळाडू तथा भारतीय संघाचे सुवर्णपदक विजेते सागर नंदकिशोर बोर्डे यांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मा. पोलीस अधीक्षक (SP) साहेबांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात विशेष निमंत्रित करून सत्कार केला.
यावेळी मा. SP साहेबांनी लॅक्रॉस खेळाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेत सागर बोर्डे यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रवासाचे कौतुक केले. त्यांच्या देशासाठी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत प्रशस्तीपत्र प्रदान करून त्यांचा विशेष गौरव करण्यात आला.
तसेच त्यांच्या आई-वडिलांशी संवाद साधत, “तुमचा मुलगा देशासाठी खेळतो, याबद्दल तुम्हाला कसे वाटते?” अशी आपुलकीने विचारपूस केली. यावर त्यांच्या आई-वडिलांनी, “आमच्या मुलाने देशासाठी खेळून भारताचे नाव उज्ज्वल केले, हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे,” अशी भावना व्यक्त केली.
मा. SP साहेबांनी सागर बोर्डे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत भविष्यात आणखी मोठे यश संपादन करून देश, राज्य आणि बुलढाणा जिल्ह्याचे नाव उंचावावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
या सत्कारामुळे सागर बोर्डे यांना नव्या जोमाने पुढील स्पर्धांसाठी प्रेरणा मिळाली असून, जिल्ह्यातील अनेक युवा खेळाडूंना देखील क्रीडा क्षेत्रात मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा मिळाली आहे.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!