समृध्दी महामार्गावर दोन भीषण अपघात; पाच जखमी, बोलेरो जीप टायर फुटून पलटी

सिंदखेडराजा

मुंबईहून नागपूरकडे जाणाऱ्या ट्रकने अचानक लेन बदलल्याने मागून येणारी ट्रॅव्हल ट्रकवर आदळली. त्यानंतर काही क्षणांतच मागून भरधाव येणाऱ्या कारने अपघातग्रस्त ट्रॅव्हलला जोरदार धडक दिली. या विचित्र अपघातात ट्रॅव्हलमधील दोन तर कारमधील तीन जण जखमी झाले. त्याच नागपूर कॉरिडॉरवर दोन तासांनंतर बोलेरो जीपचा टायर फुटल्याने ती पलटी झाली. हे दोन्ही अपघात रविवारी सिंदखेडराजा हद्दीत घडले.

पहाटे सुमारे ४ वाजता मुंबईहून नागपूरकडे जाणाऱ्या ट्रकने अचानक लेन बदलल्याने मागून येणारी ट्रॅव्हल (क्र. MH 14 LX 1320) ट्रकच्या मागील बाजूस जाऊन धडकली. अपघातानंतर ट्रकचालकाने वाहन न थांबवता घटनास्थळावरून पलायन केले. या अपघातात ट्रॅव्हलचे मोठे नुकसान झाले असून त्यातील दोन प्रवासी किरकोळ जखमी झाले.

पहिल्या अपघातातून सावरण्यापूर्वीच मागून भरधाव येणाऱ्या कारने (क्र. MH 43 CU 1161) अपघातग्रस्त ट्रॅव्हलला जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील मनीष पांडे गंभीर जखमी झाले असून पवन मिश्रामोहित मिश्रा हे किरकोळ जखमी झाले. जखमींना तातडीने स्थानिक ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

यानंतर सकाळी सुमारे ६ वाजता पहिल्या अपघातस्थळापासून काही अंतरावर पंढरपूरहून नागपूरकडे जाणाऱ्या बोलेरो जीपचा (क्र. MH 49 BR 1432) टायर अचानक फुटल्याने जीप महामार्गावर पलटी झाली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.

दोन्ही अपघातांमुळे नागपूर कॉरिडॉरवर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली असून फरार ट्रकचालकाचा शोध सुरू आहे.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!