टुणकी खुर्द येथे श्रीमद् भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताहाची उत्साहात सांगता

प्रतिनिधी | टुणकी
खुर्द येथील आदिमाया शक्ती गंगामाता मंदिर परिसरात आयोजित करण्यात आलेल्या श्रीमद् भागवत अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता बुधवारी ४ फेब्रुवारी रोजी काल्याच्या कीर्तनाने भक्तिमय वातावरणात करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या धार्मिक सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर भक्तीरसात न्हाऊन निघाला होता.
गंगा भक्त सांधी चंद्रप्रभामाई यांच्या प्रेरणेने आयोजित या सप्ताहात दररोज पहाटे काकडा आरती, विष्णुसहस्रनाम, श्रीमद् भागवत कथा, हरिपाठ तसेच रात्री हरिकीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. सप्ताहादरम्यान ह.भ.प. गजानन महाराज कोल्हे, आकाश महाराज, अमृत गाढे महाराज, सुरेश महाराज, ज्योती काळे, मनोज महाराज व गजानन महाराज गायकवाड आदी नामवंत कीर्तनकारांनी आपल्या रसाळ वाणीतून भाविकांना मंत्रमुग्ध केले. सप्ताहाचा समारोप ह.भ.प. गोपाल महाराज येरूळकर (वडगाव दिघी) यांचे काल्याचे कीर्तनाने करण्यात आले. यावेळी त्यांनी श्रीमद् भागवत कथेचे सार विशद करत नामस्मरणाचे महत्त्व अधोरेखित केले. कीर्तनानंतर दुपारी १२ ते ३ या वेळेत भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या महाप्रसादाचा लाभ परिसरातील हजारो भाविकांनी घेतला.
हा धार्मिक सोहळा यशस्वी करण्यासाठी टुणकी खुर्द व परिसरातील भाविक, भजनी मंडळ तसेच समस्त ग्रामस्थांनी अथक परिश्रम घेतले. सप्ताहाच्या निमित्ताने दररोज सायंकाळी काढण्यात येणाऱ्या दिंडी प्रदक्षिणेमुळे गावातील वातावरण चैतन्यमय झाले होते. या सप्ताहामुळे सामाजिक एकोपा वाढून आध्यात्मिक विचारांची देवाणघेवाण घडल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

भक्ती आणि एकतेचा उत्सव
टुणकी खुर्द येथे आयोजित श्रीमद् भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताहामुळे संपूर्ण गाव भक्तीरसात न्हाऊन निघाले होते. दररोज पहाटे काकडा आरतीपासून रात्री हरिकीर्तनापर्यंत चाललेल्या या सप्ताहाने गावात आध्यात्मिक चैतन्य निर्माण झाले. दिंडी, हरिपाठ, कीर्तन व नामस्मरणाच्या माध्यमातून ग्रामस्थांमध्ये सामाजिक एकोपा दृढ झाला. काल्याच्या कीर्तनाने या भक्तीमय सोहळ्याची सांगता झाली, तर महाप्रसादातून सर्वांनी एकत्र येत भक्ती-समतेचा अनुभव घेतला.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!