निसार’ भारतात 100 मी. माती आर्द्रतेचा डेटा देणार

बैंगलुर,
भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने शनिवारी सांगितले की ‘निसार’( नासा-इस्रो सिंथेटिक अपार्चर रडार) दर १२ दिवसांनी उच्च-रिझोल्यूशन आणि विस्तृत स्वॅथ डेटा(उपग्रहाच्या कक्षेत पृथ्वीवर टिपलेला रुंद पट्टा) देण्यासाठी भारतीय भूभागाचे एस-आणि एल-बँडमध्ये प्रतिमा तयार करत आहे. १०० मीटरच्या उच्च रिझोल्यूशनवर माती-आर्द्रता उत्पादनांची निर्मिती प्रदर्शित करण्यासाठी या डेटाचा प्रभावीपणे वापर केल्याचे त्यात म्हटले आहे.
पीक आरोग्य, सिंचन गरजा आणि दुष्काळाच्या धोक्याचे एक प्रमुख सूचक असल्याने, माती-आर्द्रता भारताच्या शेती आणि पाणी व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका बजावते.एस-आणि एल-बँड डेटा वापरून प्रदर्शित केलेली माती-आर्द्रता उत्पादने, भारताच्या विविध कृषी-हवामान प्रदेशांमध्ये – सिंचित मैदाने व पावसाळी शेतजमिनींपासून ते अर्ध-शुष्क क्षेत्रांपर्यंत सुसंगत अंदाज प्रदान करतात.



