संस्थेवर २८९ कोटीचा खर्च,अनं केवळ १५ विद्यार्थी

२५ एक्करचा कॅम्पस, मोदींनी केले होते उदघाटन

उत्तरप्रदेश | प्रतिनिधी

२५ एक्कर परिसरात पसरलेल्या शिक्षण संस्थेवर तब्बल २८९ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. या संस्थेचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. प्रचंड सुविधा असल्यानंतर ही या संस्थेत आज रोजी केवळ १५ विद्यार्थी शिक्षण घेत असल्याची खळबळ जनक माहिती समोर आली आहे.
उत्तरप्रदेश येथील ग्रेटर नोएडा येथील पंडीत दिन दयाल उपाध्याय पुरातत्व संस्थेत सर्व सुविधा, भव्य दिव्य इमारत, प्रशस्त परिसर उभारण्यात आले. वर्ष २०१६ मध्ये तत्कालीन गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते या इमारतीची पायाभरणी करण्यात आली. २०१९ मध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या इमारतीचे उदघाटन केले. पुरातत्व क्षेत्रात ही संस्था एक प्रमुख केंद्र बनेल या उददेशने शासनाने सदर प्रकल्प उभारला होता. आज सात वर्ष उलटली असून या प्रकल्पात केवळ १७ विद्याथीर्च असल्याची माहिती समोर आली आहे. यात १० विद्यार्थी व ५ विद्यार्थीनीचा समावेश आहे. या ठिकाणी, लॅब, लायब्ररी, शिकवणी सर्वकाही आहे, मात्र विद्यार्थीच नसल्याने लॅब व लायब्ररी सातत्याने बंद असल्याची माहिती आहे. सर्वात विशेष म्हणजे या शिक्षण संस्थेत अभ्यासक्रमच ठरवण्यात आलेला नाही, त्यामुळे शिक्षक ही नाही. विद्यार्थांना केवळ फिल्डवर्क देण्यात आले असल्याने कोटयावधीची ही संस्था आता बंद होण्याच्या मार्गावर असल्याने चर्चा होत आहे.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!