जास्तच खुमखुमी असेल तर ठाण्यातून उभे रहा

खासदार श्रीकांत शिंदेंचे गणेश नाईकांना खुले आव्हान

ठाणे,

तुम्ही एकनाथ शिंदे यांच्या नादी लागा, पण माझ्या नादी लागू नका. जास्तच खुमखुमी असेल तर कल्याण किंवा ठाण्यातून माझ्याविरोधात खासदारकीला उभे राहा, असे खुले आव्हान शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी भाजप नेते व मंत्री गणेश नाईक यांना दिले आहे. गणेश नाईक यांनी केलेल्या टीकेला श्रीकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिंदे आणि नाईक यांच्यातील वाद पेटण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गणेश नाईक यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. त्यात आता श्रीकांत शिंदे यांनी एंट्री केली आहे. त्यानंतर वयावरून टीका करणाऱ्या श्रीकांत शिंदे यांना गणेश नाईक यांनी थेट इशाराच दिल आहे. माझ्या नादाला लागलात तर माजी खासदार करून टाकेन, असा इशारा नाईकांनी दिला आहे. यावर श्रीकांत शिंदे यांनी जोरदार पलटवार केला. श्रीकांत शिंदे यांनी गणेश नाईक यांच्यावर खरमरीत टीका केली आहे. ते म्हणाले, वयाच्या हिशोबाने आजार होत असतात. यामध्ये विसरभोळेपणा, चिडचिड, दिशाभूल असे आजार होत असतात. हे मी सांगू शकतो कारण मी डॉक्टर आहे, असा टोला शिंदे यांनी नाईकांना लगावला. पुढे बोलताना श्रीकांत शिंदे म्हणाले, मला माजी खासदार करण्याचे वक्तव्य त्यांनी करू नये. जर जास्तच खुमखुमी असेल तर ठाणे किंवा कल्याण लोकसभेतून, कुठूनही त्यांनी किंवा त्यांच्या मुलाने निवडणूक लढवून दाखवावी. मी त्यांच्यासमोर उभा राहील. लोकांनी मला तीन वेळ निवडून दिले आहे. तुम्ही शिंदे साहेबांच्या नादी लागा, मात्र डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नादी लागू नका.

    दरम्यान, महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिरात शिवलिंगाला दुग्धाभिषेक करून मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी शिवमंदिर कॉरिडॉर विकास कामांचा आवर्जून उल्लेख करत, आगामी काळात या भव्य कॉरिडॉरमुळे देशभरातील भाविकांसाठी हे मंदिर आकर्षणाचे केंद्र ठरेल आणि पर्यटनाला मोठी चालना मिळेल, असा ठाम विश्वास व्यक्त केला.

ADMIN

आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा ---------------------------- --------- 9822572589 .......... 9767932688 .......... politicslivenews@gmail.com ---------------------------- राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -------

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!