अब्दुल सत्तारांवर कोसळला दुःखाचा डोंगर; पत्नी नफिसाबेगम यांचे निधन,

सिल्लोड,

  सिल्लोड-सोयगाव मतदारसंघाचे आमदार व माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पत्नी नफिसाबेगम अब्दुल सत्तार  यांचे निधन झाले आहे. नफिसाबेगम या सिल्लोड नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा राहिलेल्या आहेत. त्यांच्या निधनाने कुटुंबीयांसह अब्दुल सत्तार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण सिल्लोड शहर शोकसागरात बुडाले आहे.

  नफिसाबेगम यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी सिल्लोड येथील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले आहे. त्यांच्या पश्चात पती आमदार अब्दुल सत्तार, मुले, सुना आणि असा परिवार आहे. आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास सिल्लोडमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी पार पडला आहे.  सिल्लोड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा म्हणून नफिसाबेगम यांनी शहराच्या विकासात मोठे योगदान दिले. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी स्थानिक समस्यांना विशेष प्राधान्य देत त्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतला. याशिवाय आमदार अब्दुल सत्तार ) यांच्या प्रत्येक राजकीय संघर्षात आणि चढ उताराच्या काळात त्या खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. एक संयमी आणि कर्तृत्ववान महिला लोकप्रतिनिधी म्हणून नफिसाबेगम त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनानंतर विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी शोक व्यक्त केला आहे. नफिसा बेगम यांच्या निधनाने सत्तार कुटुंबात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या जाण्याने मोठा धक्का सत्तार परिवाराला बसला आहे.

अब्दुल सत्तार हे मराठवाड्यातील मोठे नेते आहेत. एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात अब्दुल सत्तार यांनी कृषिमंत्री म्हणून काम पाहिले आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमडळात अब्दुल सत्तार यांना स्थान मिळू शकले नाही. त्यामुळे सत्तार हे नाराज असल्याची चर्चा होती.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!