असीम सरोदे यांनी टोचले सरकारचे कान
पर्यावरण संरक्षणाची भूमिका घेत सरकारला खोचक सल्ला

प्रतिनिधी | बुलडाणा,
व्यवसायाने वकील असलेले धडाडी बाण्याचे असीम सरोदे यांनी सरकारचे कान टोचले आहे. नाशिक येथील कुंभमेळ्यासाठी प्रचंड मोठया प्रमाणात वृक्षतोडी केली जात आहे. यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो आहे. या ज्वलंत मुद्यावर शासनाचे लक्ष केंद्रीत करत पर्यावरण संवर्धन करणे ही मानवी व सनातन धर्माची संस्कृती आहे असे मत मांडत देशावर प्रेम करण्याचा खोचक सल्ला ही दिला आहे.
नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याला अक्टोबर महिन्यात सुरुवात होणार आहे. त्याची सध्या जय्यत तयारी सुरू आहे. या मेळाव्यात शासनाच्यावतीने साधूग्राम तयार करण्यासाठी तपोवनातील वृक्षतोड मोठया प्रमाणात केली जात आहे. या पार्श्वभूमीवर वकील असीम सरोदे यांनी सरकारला खुले पत्र लिहून नाहक वृक्षतोड टाळण्याचा सल्ला दिला आहे. येवढेच नव्हे तर शासनाला पत्र देवून त्यांनी पर्यावरणाला राजकारणापासून दूर ठेवण्याचा सल्ल ही दिला आहे.
सोशल मीडियावर सध्या सरोदे यांचे पत्र व्हायरल होत असून पर्यावरण ऱ्हासाच्या या निर्णयामुळे अनेक शहरात नाराजी व्यक्त केली जात आहे. पर्यावरण वाचवण्यासाठी राज्यभरातील पर्यावरण प्रेमीनी सरोदे यांच्या पाठीशी उभे राहण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.



