आमदार गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर

सर्व सेवा, एकाच ठिकाणी, एकाच दिवशी उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 

बुलढाणा |
सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या विविध विभागांशी संबंधित सेवा सुलभ, पारदर्शक आणि एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेले ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ टप्पा क्रमांक-१ गुरुवारी बुलढाणा येथील वारकरी भवनात उत्साहात पार पडले. नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांना तत्काळ मार्गी लावण्यासाठी आयोजित या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या शिबिराचे उद्घाटन बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड, नगराध्यक्षा पूजाताई गायकवाड तसेच नगरपरिषद गटनेते मृत्युंजय गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिराच्या माध्यमातून महसूल, नगरपरिषद, भूमी अभिलेख, महावितरण तसेच विविध शासकीय विभागांच्या सेवा, दाखले, अर्ज प्रक्रिया, तक्रारी आणि नागरिकांचे प्रलंबित प्रश्न एकाच ठिकाणी मार्गी लावण्याचा उपक्रम राबविण्यात आला. विविध कार्यालयांचे वारंवार फेरे टाळून नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ सहज मिळावा आणि प्रशासन-जनता समन्वय अधिक मजबूत व्हावा हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता.

यावेळी बोलताना आमदार संजुभाऊ गायकवाड यांनी प्रशासनाने सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांबाबत संवेदनशील राहून तत्परतेने काम करावे, अशा सूचना दिल्या. शासनाच्या सेवा थेट नागरिकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत आणि कार्यालयीन प्रक्रियेमध्ये सामान्य माणसाला अडचणी येऊ नयेत, यासाठी अशा शिबिरांची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. शिबिरामध्ये अनेक नागरिकांच्या तक्रारींवर तत्काळ कार्यवाही करण्यात आली. तसेच विविध शासकीय योजनांची माहिती नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली. या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत करत समाधान व्यक्त केले. दरम्यान, बुलढाणा नगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक १, चंद्रमणी नगर येथील ५२ घरांचे नियमाकुल पट्टे लाभार्थ्यांना आमदार संजुभाऊ गायकवाड यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला असून त्यांच्या घरांच्या मालकी हक्काचा मार्ग अधिकृतपणे मोकळा झाला आहे.

तसेच विविध महिला बचत गटांना शासनाच्या योजनांतर्गत अनुदानाचे वाटप करण्यात आले. यामुळे महिला सक्षमीकरणाला चालना मिळणार असून बचत गटांना आर्थिक बळ मिळणार आहे. या कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी शरद पाटील, तहसीलदार विठ्ठल कुमरे, नगर  परिषद मुख्याधिकारी गणेश पांडे यांच्यासह नगरपालिकेचे सभापती, नगरसेवक, विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘सर्व सेवा, एकाच ठिकाणी, एकाच दिवशी’ या संकल्पनेवर आधारित या महसूल समाधान शिबिरामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून प्रशासन जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले.

ADMIN

आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा ---------------------------- --------- 9822572589 .......... 9767932688 .......... politicslivenews@gmail.com ---------------------------- राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -------

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!