सोशल मीडियावर अश्लील मॉर्फिंगचा प्रकार उघड; लोणार पोलिसांची तातडीची कारवाई

लोणार

 सोशल मीडियाचा गैरवापर करून एका महिलेचा चेहरा मॉर्फ करत अश्लील फोटो व व्हिडिओ प्रसारित करणाऱ्या तरुणाला लोणार पोलिसांनी अटक केली आहे. सायबर गुन्ह्याच्या या गंभीर प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीबी परिसरातील एका महिलेने लोणार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. अज्ञात व्यक्तीने तिचा चेहरा वापरून अश्लील व्हिडिओ तयार केले व ते व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पीडितेसह गावातील काही महिलांना पाठवले होते. आरोपीने बनावट ओळख वापरत काही महिलांना व्हिडिओ कॉल करून त्रास दिल्याचाही प्रकार समोर आला आहे.

तक्रार दाखल होताच लोणार पोलिसांनी सायबर तांत्रिक तपास सुरू केला. तपासादरम्यान आरोपीचा माग काढण्यात पोलिसांना यश आले. रवी गजानन वायल (वय २१, रा. खालेगाव, ता. लोणार) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याला ८ मे रोजी ताब्यात घेण्यात आले. गुन्ह्यात वापरण्यात आलेला सुमारे २० हजार ५०० रुपये किमतीचा वन प्लस मोबाईल फोन पोलिसांनी जप्त केला आहे.

ही कारवाई बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि मेहकर उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक प्रकाश सदगीर, गणेश लोढे, अनिल शिंदे तसेच सायबर सेलचे राजू अडवे व पवन मखमले यांनी तपासात महत्त्वाची भूमिका बजावली.

सायबर माध्यमांचा गैरवापर करून महिलांची बदनामी करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!