किशोरवयीन विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्व विकास शिबिरात फोटोग्राफी सत्र

बुलडाणा,

     चेतना विकास विद्यालय, परडा येथे ग्रीष्मकालीन किशोरवयीन विद्यार्थ्यांसाठी १५ मे ते ३० मे दरम्यान पंधरा दिवसीय व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरात शिक्षण, संस्कार, स्वास्थ्य, उत्पादन कार्य, न्याय व सुरक्षा आदी विविध विषयांवर मार्गदर्शनपर सत्रे आयोजित करण्यात येत आहेत.

  ‘चेतना विकास मूल्य शिक्षण’ उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात येत असून विविध विषयांवरील तज्ज्ञांचे मार्गदर्शन सहभागी विद्यार्थ्यांना दिले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून फोटोग्राफी आणि कॅमेरा हाताळणी तंत्र या विषयावर विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले.  या सत्रात विद्यार्थ्यांना ट्विन लेन्स कॅमेरा, एसएलआर, डीएसएलआर तसेच मिररलेस कॅमेऱ्यांची माहिती देण्यात आली. विविध कॅमेऱ्यांची रचना, उपयोग आणि छायाचित्रणातील तांत्रिक बाबी विद्यार्थ्यांनी उत्साहाने जाणून घेतल्या.

फोटोग्राफी मेंटॉर पियुष टाकळकर यांनी विद्यार्थ्यांना फोटोग्राफीचे मूलभूत तंत्र, फ्रेमिंग, प्रकाशयोजना तसेच कॅमेरा हाताळणीबाबत मार्गदर्शन केले. सत्राला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!