खळबळजनक ! चार मुलांना विहिरीत फेकून पित्याने केली आत्महत्या
जळगाव जामोद तालुक्यातील घटना; जिल्हयाभरात खळबळ

बुलडाणा,
तालुक्यातील भाले अंजन येथे घरगुतीवादातून पित्याने आपल्या चार मुलांना विहिरीत फेकून त्यांची हत्या केली, पश्चात स्वता त्याच विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. ही घटना रविवारी रात्री घडल्याने जिल्हयाभरात एकच खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील भाले अंजन गावातील विजय मुसा किराडिया याचे मागील काही महिन्यापासून पत्नी सोबत सातत्याने वाद होत होते. दरम्यान त्याने पत्नीला माहेरी सोडले. रविवारी सकाळी तो घरातील काम करत असतांना त्याच्या नातेवाईकांनी त्याला तू स्वतः काम का करतो तुझी बायको कुठे गेली. असा प्रश्न विचारला. या विषयावर विजय अधिकच त्रस्त झाला होता. काही तासानंतर विजय आपल्या सर्व मुलांसोबत येथील धरण प रिसरात गेला. त्या ठिकाणी असलेल्या विहिरीत आपल्या प्रित किराडिया, प्राची किराडिया, पूर्वी किराडिया व पियुष किराडिया यांना फेकून त्यांची हत्या केली. थोडया वेळानंतर त्याने त्याच विहिरीत जीवन संपवले. घटनेची माहिती मिळताच पोलिस प्रशासनात एकच खळबळ उडाली. विहिरीतून पाचही जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी जळगाव जामोद ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती आहे.
याप्रकरणी, पुढील चौकशी जळगाव जामोद पोलीस करत आहेत.




