लोणार मध्ये कांग्रेस पक्षाच्यावतीने कर्जमाफीचा जीआरची करण्यात आली होळी

लोणार

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वात व शहर काँग्रेस कमिटी व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने नुकताच फडणवीस सरकारने जाहीर केलेल्या फसव्या कर्जमाफी विरोधात लोणार तहसील चे तहसीलदार यांना निवेदन देऊन निषेध करण्यात आला व त्यानंतर कर्जमाफीचा जीआरची होळी करण्यात आली. सदर आंदोलन नुकतेच करण्यात आले.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील अवचार यांनी राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेवर टीका करत ही कर्जमाफी शेतकऱ्यांची दिशाभूल करणारी असल्याचा आरोप केला. कर्जमाफीमध्ये मोठ्या प्रमाणात अटी घालण्यात आल्याने अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहतील, असा दावा त्यांनी केला. दरम्यान कांग्रेस पक्षाच्यावतीने लवकरच  गावागावांत जाऊन शेतकरी व नागरिकांना कर्जमाफीच्या अटींबाबत माहिती दिली जाणार आहे.  शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळेपर्यंत काँग्रेस पक्ष आंदोलन आणि विरोध सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

      यावेळी राम विजय बुरुंगले, देवानंद पवार, शांतीलालजी गुगलीया, साहेबराव पाटोळे, नंदू भाऊ बोरे, नितीन शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्रुजी फुके यांनी केले, प्रस्ताविक शेख समद शेख अहमद यांनी मांडले तर आभार प्रदर्शन नितीन शिंदे यांनी केले. कार्यक्रमास काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  लोणारात प्रकाश पाटील यांचा सत्कार

जिल्हा कांग्रेस कमेटीचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांचे   लोणार शहरात आगमन झाल्यानंतर हॉटेल आस्वाद येथे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी लोणार शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख समद शेख अहमद, तालुका काँग्रेस अध्यक्ष अश्रुजी फुके आणि माजी नगराध्यक्ष भूषण पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. कार्यक्रमात लक्ष्मण दादा घुमरे यांनी प्रकाश पाटील यांचे कौतुक करत त्यांना पक्षाने जिल्हाध्यक्षपद देऊन योग्य न्याय दिल्याचे सांगितले. तसेच त्यांनीही राज्य सरकारच्या कर्जमाफी धोरणावर टीका केली.

ADMIN

आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा ---------------------------- --------- 9822572589 .......... 9767932688 .......... politicslivenews@gmail.com ---------------------------- राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -------

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!