सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी संघटनात्मक बळ महत्त्वाचे : विजय अंभोरे

प्रतिनिधी | बुलडाणा,
सामाजिक चळवळीत कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांना संघटनेतील पदाची जबाबदारी मिळाल्यास समाजहिताचे प्रश्न अधिक प्रभावीपणे शासन दरबारी मांडता येतात. संघटित पद्धतीने न्याय्य मागण्या मांडल्यास त्या मार्गी लागण्यास मदत होते, असे प्रतिपादन साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरमचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेना नेते विजय अंभोरे यांनी केले.
ते, बुलडाणा येथील शासकीय विश्रामगृहात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरम व सोशल फोरम अंतर्गत ब्रास बँड संघटनेच्या नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. सदर कार्यक्रम नुकतेच पार पडला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवृत्ती तांबे यांनी केले. श्रीकृष्ण शिंदे, बी. के. खरात, लक्ष्मणराव गवई व दादाराव महाले यांनी मनोगत व्यक्त केले. बैठकीचे संचालन श्रीकृष्ण शिंदे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सचिन कांबळे यांनी मानले. कार्यक्रमास जिल्हाभरातील मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी सोपानराव पानपाटील, मुख्य प्रदेश सरचिटणीस बी. के. खरात, शिव लहुसेना संघटनेचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती तांबे, प्रदेश सरचिटणीस लक्ष्मणराव गवई, आशिष साळवे, ओमप्रकाश नाटेकर, रामा जाधव, गजानन गायकवाड, विक्की आव्हाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यांच्या करण्यात आल्या नियुक्त्या
ब्रास बँड संघटनेच्या विविध पदांवर यावेळी नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. त्यामध्ये दादाराव महाले यांची जिल्हा कार्याध्यक्ष, सुभाष निकाळजे, संजय काकफळे व सखाराम पवार यांची जिल्हा उपाध्यक्ष, तेजराव बाजोडे व विश्वनाथ महाले यांची जिल्हा संघटक, गजानन गायकवाड यांची जिल्हा सरचिटणीस, तर दिनेश पारेकर यांची जिल्हा सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. तसेच ज्ञानेश्वर निकाळजे (जालना जिल्हा संघटक), रमेश सुरूशे (बुलडाणा तालुका अध्यक्ष), शाम साळवे (चिखली तालुका अध्यक्ष), सचिन कांबळे (चिखली शहर अध्यक्ष), रंजित साळवे (चिखली शहर कार्याध्यक्ष), नामदेव ढगे, आत्माराम यंगड व गजानन निकाळजे (तालुका उपाध्यक्ष), कैलास नाडे (सिंदखेडराजा तालुका अध्यक्ष), गजानन अवसरमोल (देऊळगाव राजा तालुका अध्यक्ष), नाना बोरले (मलकापूर तालुका अध्यक्ष), दयाराम सोनोने (उपाध्यक्ष), विजय सोनोने (कार्याध्यक्ष) आणि भास्कर जाधव (संग्रामपूर तालुका अध्यक्ष) यांची नियुक्ती करण्यात आली. सोशल फोरमच्या मुख्य कार्यकारिणीत नंदकिशोर जाधव यांची शेगाव तालुका अध्यक्ष तर कडू हिवाळे यांची मोताळा तालुका अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.

ब्रास बँड संघटनेला नवे नेतृत्व
ब्रास बँड व्यवसायाशी संबंधित विविध प्रश्न सोडविण्यासाठी संघटनेची ताकद वाढविण्याच्या उद्देशाने जिल्हा, तालुका व शहरस्तरावर नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. यामुळे संघटनेच्या कामकाजाला अधिक गती मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

समाजहिताच्या प्रश्नांवर भर
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरमच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवून त्यांचे निराकरण करण्यासाठी संघटित प्रयत्न करण्यात येणार असल्याचे विजय अंभोरे यांनी यावेळी स्पष्ट केले.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!