फिफाच्या पार्श्वभूमिवर बुलडाण्यात ही येणार स्पर्धेला रंगत

बुलडाणा,

जागतिकस्तरावर सुरु असलेल्या फिफा वर्ल्डकपचा फिवर जगभरात बघावयास मिळत आहे. याच पार्श्वभूमिवर बुलडाणा जिल्हयात ही फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषद, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने २०२६-२७ या वर्षातील जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा १७ ते १९ जुलैदरम्यान सहकार विद्या मंदिर, चिखली रोड, बुलडाणा येथे होणार असून, जिल्ह्यातील शाळा व संघांना सहभागासाठी नोंदणीचे आवाहन करण्यात आले आहे. सदर नोंदणीसाठी १० जुलै पर्यतची मुदत देण्यात आली आहे.
ही स्पर्धा सब-ज्युनिअर (१५ वर्षांखालील मुले) तसेच ज्युनिअर (१७ वर्षांखालील मुले व मुली) अशा गटांत होणार आहेत. सब-ज्युनिअर गटासाठी खेळाडूचा जन्म १ जानेवारी २०१२ किंवा त्यानंतरचा असावा, तर ज्युनिअर गटासाठी १ जानेवारी २०१० किंवा त्यानंतरचा जन्म असणे आवश्यक आहे. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सर्व शालेय संघांनी प्रथम ऑनलाइन नोंदणी करून त्याची प्रत जोडणे बंधनकारक आहे. त्यानंतर ऑफलाइन अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडानगरी, जांभरून रोड, बुलढाणा येथे १० जुलै २०२६ पर्यंत जमा करावा लागणार आहे. मुदतीनंतर कोणत्याही संघाचा अर्ज स्वीकारला जाणार नाही. स्पर्धेत सहभागी खेळाडूंना पात्रता फॉर्म, जन्मदाखला, आधारकार्ड, दाखल-खारिज प्रत, पासपोर्ट आणि मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांची सही व शिक्का असलेली कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. तसेच १५ वर्षांखालील खेळाडूंकरिता वैद्यकीय प्रमाणपत्र आणि एआयएफएफ मान्यताप्राप्त वय निश्चिती चाचणी बंधनकारक राहणार आहे. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत वैद्यकीय तपासणीदरम्यान एखादा खेळाडू वयोमर्यादेपेक्षा अधिक असल्याचे आढळल्यास संपूर्ण संघ बाद करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती भक्ती आंब्रे यांनी दिली आहे.
अधिक माहितीसाठी इच्छुकांनी डॉ. जीवन मोहोड यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे

असे आहे स्पर्धेचे वेळापत्रक
जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धांचे आयोजन १७ ते १९ जुलैदरम्यान बुलडाणा येथे करण्यात आले आहे. १७ जुलै रोजी १५ वर्षांखालील सब-ज्युनिअर मुलांची स्पर्धा होणार असून, १८ जुलैला १७ वर्षांखालील ज्युनिअर मुलांचे सामने रंगणार आहेत. तर १९ जुलै रोजी १७ वर्षांखालील मुलींसाठी ज्युनिअर गटातील स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सर्व सामने सहकार विद्या मंदिर, चिखली रोड, बुलडाणा येथे सकाळी ९ वाजता सुरू होतील.

नोंदणीपूर्वी ही कागदपत्रे आवश्यक
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंनी पात्रता फॉर्म, जन्मदाखला, आधारकार्ड, दाखल-खारिज प्रत आणि पासपोर्ट या सर्व मूळ कागदपत्रांसह अर्ज सादर करणे आवश्यक आहे. संबंधित शाळेच्या मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांची सही व शिक्का असलेली कागदपत्रेच ग्राह्य धरली जाणार आहेत. याशिवाय १५ वर्षांखालील खेळाडूंकरिता वैद्यकीय प्रमाणपत्र तसेच आयएएफएफ मान्यताप्राप्त वय निश्चिती चाचणीचा अहवाल सादर करणे बंधनकारक राहणार आहे

0000

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!