मोताळा तालुका बुलढाण्याच्या कार्यक्षेत्रातच ठेवावा; युवक काँग्रेसची आग्रही मागणी

 

बुलढाणा,

खामगाव येथे प्रस्तावित अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात मोताळा तालुक्याचा समावेश करण्याच्या प्रस्तावाविरोधात युवक काँग्रेसच्या वतीने आज जिल्हाधिकारी महोदयांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी तालुकाभर राबविण्यात आलेल्या स्वाक्षरी अभियानातून संकलित झालेल्या हजारो नागरिकांच्या सह्यांसह निवेदन सादर करून मोताळा तालुका बुलढाणा अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातच कायम ठेवण्यात यावा, अशी आग्रही मागणी करण्यात आली.

शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी महोदयांसमोर मोताळा तालुक्यातील नागरिकांच्या भावना, प्रशासकीय अडचणी आणि जनहिताचे मुद्दे मांडले. मोताळा तालुक्याचा खामगाव अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात समावेश झाल्यास सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना शासकीय कामांसाठी अधिक अंतराचा प्रवास करावा लागेल. त्यामुळे वेळ, पैसा आणि श्रम यांचा अतिरिक्त भार नागरिकांवर पडणार असून प्रशासन नागरिकांपासून दूर जाण्याची शक्यता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव अमर राजीव कुळे यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसच्या वतीने तालुकाभर गावागावात जाऊन व्यापक स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. या अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून हजारो नागरिकांनी आपल्या सह्यांद्वारे मोताळा तालुक्याचा प्रस्तावित कार्यक्षेत्रात समावेश करण्यास विरोध दर्शविला. या सर्व स्वाक्षऱ्या जिल्हाधिकारी महोदयांकडे सुपूर्द करून जनभावनांचा आदर राखत योग्य निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी माजी सभापती कृ उ बा समिती मोताळा गणेशराव पाटील, माजी पंचायत समिती सभापती उखाभाऊ चव्हाण, मिलिंद जैस्वाल, मा पंचायत समिती सदस्य साहेबराव डोंगरे, शहरअध्यक्ष दत्ता काकस, मोताळा तालुका कार्याध्यक्ष श्रीकृष्ण खराटे, भास्कर आघाम, अतुल जोहरी, तालुकाध्यक्ष युवक कॉंग्रेस आबीद कुरेशी, शाहिद शेख, मुसेब शेख, कैलास गडाख, दिलीप मोरे, शेख शब्बीर, इरफान पठाण, शेख अफफान, विकास बस्सी, स्वप्नील राहणे, एकनाथ चव्हाण, मिलिंद अहिरे, कैलास जवरे, शुभम घोडेकर, शेख अमीर, तौसिफ शेख, समीर शेख, सलमान खान यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

 

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!