तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

शेगाव–बडनेरा रेल्वेत तरुणीची 'गांधीगिरी'; छेडछाड करणाऱ्याला शिकवला धडा

 

शेगाव

शेगावहून बडनेराकडे जाणाऱ्या भुसावळ–वर्धा प्रवासी रेल्वेत एका तरुणीची छेडछाड करणाऱ्या तरुणाला संबंधित तरुणीने गांधीगिरी करत धडा शिकवला. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून प्रवाशांकडून तरुणीच्या धाडसाचे कौतुक केले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शेगाव येथून रेल्वेत प्रवास करणाऱ्या एका तरुणी रेल्वेतील एका तरुणाने कथितपणे छेडछाड करण्यास सुरुवात केली. रेल्वेत गर्दी असल्याने सुरुवातीला सदर तरुणीने त्याच्याकडे दुर्लक्ष केले, परंतू त्याच्या छेडखानीचे प्रमाण वाढल्याने तरुणीने त्याला विरोध केला. तरीही युवकाची कुचराई सुरुच हाेती. अखेर सदर छेडखानीला त्रस्त होवून युवतीने इतर प्रवाशांच्या मदतीने संबंधित तरुणाला रोखले. यानंतर तरुणीने त्याला मारहाण न करता स्वतःच्या हातातील बांगड्या काढून त्या तरुणाच्या हातात घातल्या. तसेच त्याच्या गालावर व ओठांवर लिपस्टिक लावून त्याच्या गैरवर्तनाचा निषेध व्यक्त केला. या संपूर्ण घटनेदरम्यान रेल्वे डब्यातील काही प्रवाशांनी व्हिडिओ चित्रीकरण केले असून तो सोशल मीडियावर वेगाने प्रसारित होत आहे.

 

दरम्यान, सदर धाडसी तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असल्याने सर्वत्र तरुणीचे कौतुक केले जात आहे.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!