politicslive ‘च्या बातमीचा दणका; मेहकर-सुलतानपूर रस्त्यावरील भेगा बुजण्यास सुरुवात 

लोणार

मेहकर–सुलतानपूर रस्त्यावरील जीवघेण्या भेगांचा प्रश्न ‘politicslive’ च्या माध्यमातून लावून धरण्यात आला होता. दोन दिवसांपूर्वीच या गंभीर समस्येबाबत वृत्त प्रसिद्ध करून संबंधित विभागाचे लक्ष वेधले होते. या जनहिताच्या बातमीची सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दखल घेतली असून, गेल्या दोन दिवसांपासून मेहकर–सुलतानपूर मार्गावरील जीवघेण्या भेगा बुजवण्याचे दुरुस्ती काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. या धडक कारवाईमुळे वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला असून आमच्या बातमीचा जोरदार परिणाम दिसून आला आहे.
रस्त्यावरील भेगा बुजवण्याचे काम सुरू झाले असले, तरी आता सुलतानपूर येथील पुलाचे अत्यंत महत्त्वाचे काम अद्यापही बाकी आहे. तसेच छत्रपती संभाजी रोड वरील खड्डे बुजविणे बाकी आहे सुलतानपूर येथील या पूलाला अजून ही खड्डे पडलेले असल्यामुळे येथे अपघाताचा धोका कायम असून, वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. रस्त्याप्रमाणेच आता प्रशासनाने कोणतीही दिरंगाई न करता सुलतानपूर येथील पुलाचे रखडलेले कामही तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून जोर धरत आहे.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!