पुन्हई गावाजवळील प्रस्तावित डंपिंग ग्राउंड तात्काळ रद्द करा; मृत्युंजय गायकवाड

बुलढाणा :

मोताळा नगरपंचायतीमार्फत पुन्हई गावालगत नियोजित करण्यात आलेले डंपिंग ग्राउंड तात्काळ रद्द करावे, या मागणीसाठी ग्रामस्थांनी सोमवार, दि. १७ ऑगस्ट २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा येथे धडक देत निवेदन सादर केले. 🇦🇱🇦🇱सदर निवेदन नगरपरिषदेचे गटनेते मृत्युंजय संजय गायकवाड यांच्या उपस्थितीत  निवासी उपजिल्हाधिकारी (RDC)  सुरेशज कव्हळे यांच्याकडे सादर करण्यात आले.

पुन्हई गावाजवळ डंपिंग ग्राउंड उभारण्याचा प्रस्ताव ग्रामस्थांच्या आरोग्य, पर्यावरण आणि गावाच्या भविष्यासाठी गंभीर परिणाम करणारा असल्याचा आक्षेप ग्रामस्थांनी निवेदनातून नोंदविला. गावाच्या अगदी जवळ कचरा संकलन व विल्हेवाटीची व्यवस्था केल्यास परिसरातील पर्यावरणावर विपरीत परिणाम होण्याची तसेच नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने सदर नियोजनाचा तातडीने फेरविचार करून ते रद्द करावे, अशी मागणी करण्यात आली.

युवानेते मृत्युंजय गायकवाड यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांनी प्रशासनासमोर आपली भूमिका स्पष्टपणे मांडली. गावाच्या हिताशी निगडित असलेल्या या प्रश्नाकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहून नागरिकांच्या तक्रारींची दखल घ्यावी आणि पर्यावरणपूरक पर्यायी व्यवस्था निर्माण करण्याबाबत योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

गावालगत डंपिंग ग्राउंडमुळे भविष्यात दुर्गंधी, अस्वच्छता, कचऱ्यामुळे होणारे प्रदूषण तसेच नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली. त्यामुळे कोणत्याही प्रकारची घाई न करता संबंधित विभागांनी प्रत्यक्ष पाहणी करून ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घ्यावे आणि कायदेशीर व पर्यावरणीय निकषांची पूर्तता झाल्याशिवाय गावाजवळील प्रस्तावित डंपिंग ग्राउंडला मान्यता देऊ नये, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

यावेळी किसान सेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गायकवाड, स्वीय सहाय्यक श्रीकृष्ण शिंदे, ज्ञानेश्वर खांडवे,विष्णू तायडे, योगेश बांगर, गोपाल काटे, प्रदीप सहावे, सौरभ वाघोदे, मोहन राऊत, गणेश पुरणे, गजानन राऊत, अमोल वानखेडे, शैलेश राऊत, विशाल सहावे, गणेश राऊत यांच्यासह पुन्हई गावातील जागरूक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!